अंबांनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक

रिलायन्स हॉस्पिटल आणि अंबानी कुटुंबियांना दिली होती धमकी

अंबांनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना आणि कुटुंबियांना धमकी देणाऱ्या इसमाचा पत्ता लागला असून दरभंगा, बिहार येथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला लवकरच मुंबईत आणण्यात येणार आहे.

रिलायन्सच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात सांगितले आहे की, रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलच्या कॉल सेंटरला हे फोन दोनवेळा आले आणि त्याने धमकी दिली. हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी या व्यक्तीने दिली होती. शिवाय, अंबांनी परिवारातील लोकांना जीवे मारण्याचा इशाराही त्याने दिला होता. त्याला बिहारमधून अटक केली गेली आहे.

रिलायन्स हॉस्पिटलच्या कॉल सेंटरच्या नंबरवर दोन वेळा अशी धमकी देण्यात आल्याची माहिती परिमंडळ २ चे उपायुक्त निलोत्पक यांनी दिली. ते म्हणाले की, याप्रकरणाचे गांभीर्य पाहून डीबी मार्ग पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी पथके तयार करण्यात आली.

हे ही वाचा:

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी महापौरासह १८ जणांचे घेतले बळी

सणासुदीलागाव सोडून ते येतात फूटपाथवर

आणि युरोपियन संसदेत महिलेने केस कापत केला निषेध

 

त्यानंतर दरभंगा, बिहार येथून मध्यरात्री आरोपीला बिहार पोलिसांच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. गुरुवारी या आरोपीला कोर्टात सादर केले जाईल. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे.

मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील अँटिलिया इमारतीच्या खाली जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्याचे प्रकरण देशभर गाजले होते. या प्रकरणात तत्कालिन पोलिस अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. अंबानी यांच्या या घराबाहेर एक कार सापडली होती त्यात ही स्फोटके असल्याचे स्पष्ट झाले होते. ती कार मनसुख हिरन यांची असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. पण हिरन यांचा नंतर संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह खाडीत सापडला होता. या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले होते.

Exit mobile version