कुर्ल्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक; दोनजण अद्याप फरार

पोलिसांचा तपास जारी

कुर्ल्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक; दोनजण अद्याप फरार

मुंबई उपनगरातील कुर्ला पश्चिमेकडील भागात एका ४२ वर्षीय महिलेवर तीन नराधामांनी जबरदस्ती करून अश्लील कृत्य केली. यामध्ये पीडित महिलेला विवस्त्र करून अत्याचार करण्यात आले. तसेच महिलेच्या गुप्तांगावार जळत्या सिगारेटचे चटके देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित पीडित महिलेने कुर्ला पोलिस ठाण्यात तीन नराधामांनविरुद्ध तक्रार केली असून, पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेत त्या तिघांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले असून, या तीन पैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे.

फिर्यादी महिलेबरोबर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीन इसम जबरदस्ती घरात घुसले. बबलू, वसीम व मुन्ना यांनी गैरकृत्य करणाऱ्या आरोपींची नावे त्यापैकी बबलू सापडला असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. संबंधित महिलेने कुर्ला पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक घोलप यांच्या जवळ झालेल्या कृत्याचा जबाब नोंदवला. जबाब नोंदवून झाल्या नंतर कुर्ला येथील भाभा रुग्णालयात डॉक्टरांच्या समक्ष फिर्यादी पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

मुंबई उपनगरातील कुर्ला येथे ४२ वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. बलात्कार केल्यानंतर त्या महिलेच्या गुप्तांगावर सिगरेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिला पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यास गेली तेव्हा हा घटनेची उकल झाली. संबंधित महिलेवर नराधामांनी पूर्व नियोजन करून महिलेच्या घरात सकाळी पाचच्या सुमारास घुसखोरी केली व तिला चाकूचा धाक दाखवून पीडित महिलेला विवस्त्र केले. नंतर अत्याचार करण्यास सुरुवात केली तर सदर घटनेची दोघांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केले. त्याप्रमाणे मुन्नाने फिर्यादीचे केस पकडून जमिनीवर फरपटत नेले व बबलूने त्याचे हातातील चाकूने फिर्यादीच्या दोन्ही हातावर व छातीवर वार केले.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, कुर्ला पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६डी (सामूहिक बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध), ३२४ (खतरनाक शस्त्राने स्वेच्छेने दुखापत करणे) आणि इतर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कुर्ला पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

‘अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल’

मोहम्मद याकूब सिद्दिकी उर्फ बबलू (४०) असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे तर हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. आरोपीन शोधण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दोन पथक तयार करण्यात आलेले होते. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदूलाल पाटील यांच्या पथकाला उपरोक्त नमूद आरोपी हा कामाठीपुरा, नागपाडा येथे असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाल्यानंतर या आरोपीला पकडण्यात आले. नराधम बबलूची चौकशी केली असता प्रथम दर्शनी सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Exit mobile version