महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पोलिसांकडूनच स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना एकामागून एक उघड होत आहेत. जळगाव, औरंगाबाद येथील घटना ताज्या असतानाच आता उस्मानाबादमध्येही एका पोलिसाने बंदुकीच्या धाकाने एका महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे.
हे ही वाचा:
उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथे ही घटना घडली. पोलिसच रक्षण करण्याऐवजी अशा प्रकारे महिलांवर अत्याचार करू लागले, तर न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेवर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून टिका केली आहे.
उस्मानाबाद- ३२ वर्षीय महिलेवर पोलिसाकडून बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार; दोन पानांची सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या… महा हवस आघाडी सरकारच्या राज्यात रक्षकच भक्षक झाले आहेत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 4, 2021
पोलिसाने बलात्कार केल्या नंतर या महिलेनं आत्महत्या केली आहे. ‘बंदुकीचा धाक दाखवून घरी बोलवून त्यानं माझ्यावर बलात्कार केला. त्यात माझ्या नवऱ्याचा काय दोष? मी माझं आयुष्य संपवत आहे. त्यासाठी पोलिस दलात कर्मचारी असलेल्या या व्यक्तीला अटक करावी.’ अशी नोट तिने लिहून ठेवली आहे. घटनास्थळी दोन वेगवेगळ्या चिठ्या सापडल्या असून, यातून जाचाला कंटाळून महिलेनं हे पाऊन उचललं असल्याचं कळलं आहे.
या प्रकरणात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
चालू असलेल्या अधिवेशनात देखील या घटनेचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधीची माहिती घेऊन, आजच्या आज सभागृहाला याबाबत अवगत करावे अशी मागणी केली.
उस्मानाबाद येथे पोलिसाने बलात्कार केल्याचा आरोप करीत एका महिलेने आत्महत्या केली आहे.
सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ दोषींवर कारवाई करावी!#BudgetSession pic.twitter.com/GDn6VGGxSl— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 4, 2021