कुर्ला येथील बेस्ट अपघातात जखमीपैकी एकाचा सायन रुग्णालयात सोमवारी पहाटे मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ झाली आहे. फजलु रहेमान शेख (५८) असे मृत झालेल्याचे नाव आहे, अशी माहिती कुर्ला पोलिसांनी दिली आहे. फजलू रहेमान हा घाटकोपर पश्चिम येथे राहणारा असून विवाहित मुलीला भेटायला कुर्ला येथे आला होता.
या अपघातात फजलु रहेमान त्याची पत्नी अस्मातूनिसा, मुलगी नजमा (२५) आणि नात मिस्कत (४) हे चौघे जखमी झाले होते. फजलु रहेमान हा सायन रुग्णालय तर पत्नी, मुलगी आणि नात या तिघावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा :
पक्षाची परिस्थिती २०१४ पेक्षा दारुण कोसळण्याच्या वाटेवर काँग्रेस; उतरवणार ठाकरेंचे ओझे…
१९९१चा प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा म्हणजे न्यायाच्या मार्गात ठोकलेली पाचर…
विरोधकांनी राजकारण करायचे ठरवले तर राजकीयच उत्तर मिळणार
दाऊदच्या दानिश चिकनाला ड्रग्स प्रकरणात डोंगरीतून अटक!
कुर्ला पाश्चिम येथे ९ डिसेंबर रोजी झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाले होते, जखमीमध्ये फजलु रहेमान शेख त्यांची पत्नी अस्मातूनिसा, मुलगी नजमा (२५) आणि नात मिस्कत (४) यांचा समावेश होता.
अपघाताच्या आठ दिवसांनी जखमीपैकी फजलु रहेमान शेख याचा सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे, कुर्ला बेस्ट अपघातात मृतांची संख्या ८ झाली आहे.