22 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामा'पीएफआय' संबंधी आणखी एकाला नांदेडमधून घेतले ताब्यात

‘पीएफआय’ संबंधी आणखी एकाला नांदेडमधून घेतले ताब्यात

Google News Follow

Related

महाराष्ट्र एटीएसने नांदेड जिल्ह्यातून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या एका सदस्याला अटक केली आहे. महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या सदस्यांची संख्या २१ झाली आहे.

मोहम्मद आबेद अली मोहंमद मेहबूब अली (४०) असे नांदेड येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एटीएसने यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यातून २० जणांना अटक करून वेगवेगळे ४ गुन्हे दाखल केले होते. या चार गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात मोहम्मद आबेद याला आरोपी दाखविण्यात आले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखावर तसेच पदाधिकारी यांच्या घरावर गेल्या आठवड्यात एनआयए, ईडी आणि महाराष्ट्र एटीएसने छापेमारी केली होती, त्यात एनआयए ने १००पेक्षा जास्त जणांना अटक केली होती, तसेच महाराष्ट्र एटीएसने महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यातून २० जणांना अटक केली होती. याप्रकरणात रविवारी एटीएसने नांदेड मधून मोहम्मद आंबेद अली मोहंमद मेहबूब अली याला अटक केली आहे, न्यायालयात सोमवारी हजर करन्यात आले असता न्यायालयाने २७ सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

‘धन्यवाद मोदीजी’ मोहिमेच्या माध्यमातून एवढी पत्रं पाठवली जाणार

पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांना खुशखबर!! लवकरच जागा भरणार

अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची बस उलटतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मुख्यमंत्री अशोक गेहलोत बॅकफूटवर?

 

महाराष्ट्रात या अटकेनंतर पीएफआयच्या वतीने आंदोलनही घेण्यात आले. त्यात पाकिस्तान झिंदाबाद आणि अल्ला हो अकबर या घोषणा दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता, पण त्याची सत्यता अद्याप तपासण्यात आलेली नाही. पीएफआय या संघटनेच्या माध्यमातून देशभरात अराजक माजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप आहेत. सीएए आंदोलन असो की हिजाब आंदोलन या संघटनेने सक्रीय सहभाग घेत देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या संघटनेवर गेल्या अनेक दिवसांपासून बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा