बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक; आरोपीची संख्या झाली १८

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक; आरोपीची संख्या झाली १८

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी दोन संशयितांना अटक केली असून , या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या १८ झाली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत, त्यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे.हे दोघे अटकेत असलेला प्रवीण लोणकर यांच्या संपर्कात होते, या दोघांवर हल्लेखोराना दारुगोळा पुरवल्याचा आरोप आहे.

आदित्य राजू गुळणकर (२२) आणि रफिक नियाज शेख (२२) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे असून, दोघेही पुण्यातील कर्वे नगर येथील रहिवासी आहेत.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात असे समोर आले आहे की, दोन्ही आरोपी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या प्रवीण लोणकर आणि रुपेश मोहोळ यांच्या संपर्कात होते.

हे ही वाचा:

अमेरिकेत चाय-बिस्कुटांसह सोरोस तंत्राचाही पराभव…

जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड एआय वकिलांशी संवाद साधतात…

राज ठाकरेंनी काढला फतवा, तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो पाठीशी उभे राहा!

मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

प्रवीण लोणकर आणि रूपेश मोहोळ यांनी गुन्ह्यात वापरण्याच्या उद्देशाने एक ९ एमएम पिस्तूल आणि राऊंड त्यांच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी केलेल्या तपासात ९ एमएमचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते. उर्वरित दारूगोळा शोधून ते जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या २३ वर्षीय तरुणाला बुधवारी पुण्यातून अटक करण्यात आली होती, पोलिसांनी सांगितले की, तो या गुन्हयातील १६ वा आरोपी आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला १६ वा व्यक्ती अपुणे हा गेल्या महिन्यात झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटाचा एक भाग होता. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या काही आरोपींची चौकशी केल्यानंतर अपुणेला ताब्यात घेतले आणि सिद्दीकीवर हल्ला करण्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले.23 वर्षीय तरुणाकडे बंदुक आणि गोळ्या होत्या, त्या त्याने एका वॉन्टेड आरोपीला दिल्या. त्याच्या ताब्यात असलेल्या शस्त्राचा शोध सुरू होता. सिद्दीकी (६६) यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात तीन गोळ्या झाडून हत्या केली होती.

Exit mobile version