मुंबई पुणे एक्स्प्रेस वे अपघातांचे केंद्र म्हणूनच ओळखला जातो आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर या मार्गावरील अपघातांची चर्चा सुरू झाली आहे. निष्काळजीपणामुळे आणखी एक अपघात या महामार्गावर घडला आहे.
या अपघाताचे नेमके कारण काय याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे. ५ सप्टेंबरला मध्यरात्री १.३० वाजता सदर ठिकाणी फोर्ड इको स्पोर्ट कार ही पुण्याकडे जात असताना टायर फुटल्याने शोल्डर लेनवर थांबली होती. त्यांच्या मदती करता IRB कंपनी डेल्टा फोर्स पेट्रोलिंग जीप क्र.MH 14 AH 7467 मधील स्टाफ व खालापूर पोलीस ठाणे कडील दरोडा प्रतिबंधक पथकामधील पोलीस व होमगार्ड आले होते. या टायर फुटलेल्या कारमधून उतरून इंडिकेटर लावण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर कोनही लावण्यात आले. पण तेवढ्यात शोल्डर लेनवर उभ्या असलेल्या या कारला मदत करत असताना त्यांचे पाठीमागून आलेला अज्ञात वाहनाने सदर इकोस्पोर्ट कार व डेल्टा फोर्स जीप तसेच शोल्डर लेनवर जीप मधील उभे असलेले ४ स्टाफ व इको स्पोर्ट कार मधील दोन व्यक्तींना धडक दिली आणि अपघात झाल्यावर तो कारचालक पळून गेला.
हे ही वाचा:
ही तर ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचा खेळ
कल्याणमध्ये खड्ड्यामुळे एका महिलेला गमवावा लागला जीव
‘राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार’
५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री 01:30 वा.च्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे पुणे लेनवर किमी नं.२७/८०० येथे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर अपघात घडलेला आहे. अपघातातील वाहन फोर्ड इको स्पोर्ट कार क्र.DL 12 CL 4488 आहे.
2)IRB कंपनी डेल्टा फोर्स पेट्रोलिंग जीप क्र.MH 14 AH 7467 असून ज्या वाहनाने टक्कर दिली ते वाहन अज्ञात आहे. या प्रकरणात सहा जणांना जखमी केले गेले आहे. त्यांना IRB कंपनीच्या लोकमान्य हाॅस्पिटल रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हाॅस्पिटल कामोठे येथे उपचाराकरीता नेले.