मुंबईमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवलीमध्ये शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कांदिवलीत गोळीबार केला. अंतर्गत वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
झोन ११ चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार कांदिवलीत रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी काही लोकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. याप्रकरणी तपास सुरु आहे.
गोळीबारात अंकित यादव नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच गोळीबार करणारे आणि मृत व्यक्ती एकमेकांना ओळखत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींनी एकूण चार गोळ्या झाडल्या.
हे ही वाचा:
याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल
मासेमारीसाठी गेलेले १६ मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात
युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर पुतीन यांची स्वाक्षरी
काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच
डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरुन आले होते. गोळीबार केल्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे.