जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; एक घुसखोर ठार

सीमा सुरक्षा दलाची कारवाई

जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; एक घुसखोर ठार

पाकिस्तानची मुजोरी वाढत असून सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर असाच एक घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पडल्याची माहिती आहे. यात एका घुसखोराला ठार केल्याचेही वृत्त आहे.

जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न शनिवार, ५ एप्रिल रोजी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) उधळून लावला. या कारवाई दरम्यान एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने शनिवारी दिली. आरएस पुरा सेक्टरमधील सीमा चौकी अब्दुलियनमध्ये घुसखोराला निष्क्रिय करण्यात आले, असे अधिकृत सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

सतर्क बीएसएफ जवानांना ४ आणि ५ एप्रिलच्या मध्यरात्री, जम्मू सीमावर्ती भागात संशयास्पद हालचाल असल्याचे लक्षात आले. शिवाय एक घुसखोर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडतानाही दिसला, अशी माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने दिली आहे. घुसखोराला सैन्याने वारंवार आव्हान दिले होते, पण त्याने लक्ष दिले नाही आणि तो पुढे जात राहिला. अखेर धोका ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला ठार मारले. घुसखोराची ओळख आणि हेतू शोधला जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : 

“कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने करा, त्याला ब्रह्मवाक्य समजू नका”

Bigg Boss 18 : देशातील पहिल्या एआय सुपरस्टारचे बिग बॉस १८ मध्ये स्थान निश्चित!

हे तर मुस्लिम हृदयसम्राट !

भाजपा कार्यकर्त्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहित काँग्रेस नेत्यांवर केले आरोप

बीएसएफ प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी समकक्षाकडे तीव्र निषेध नोंदवला जात आहे. बीएसएफने पोलिसांना याची माहिती दिली असून मृतदेह शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी घटनास्थळावरून हलवला आहे.

असे यशस्वी झाले भाजपाचे मिशन वक्फ... | Dinesh Kanji | Waqf Amendment Bill |  Rahul Gandhi |

Exit mobile version