भाच्याकडून मामा मामीकडे एक कोटी खंडणीची मागणी, भाच्याला अटक!

ठाणे खंडणी पथकाची कारवाई

भाच्याकडून मामा मामीकडे एक कोटी खंडणीची मागणी, भाच्याला अटक!

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धमकी देऊन सेवानिवृत्त मामाकडे एक कोटींची खंडणी मागणाऱ्या भाच्याला ठाणे खंडणी पथकाने अटक केली आहे. सुभाष रामचंद्र तुपे असे तक्रारदार मामाचे नाव असून तुपे हे एमआयडीसीमध्ये इंजिनिअर होते.त्यांची पत्नी जयश्री या देखील या देखील एमआयडीसी मध्ये कार्यकारी अभियंता होत्या, पतीच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी देखील राजीनामा दिला आहे.

ठाण्यातील पांचपखाडी येथे उच्चभ्रू वसाहतीत राहणारे तुपे दाम्पत्य यांचा अहमदनगर येथे राहणारा भाचा मंगेश अरुण थोरात (२९) तुपे दाम्पत्यानी मंगेश याला व्यवसायासाठी ६१ रुपयांची मदत केली होती, तसेच उत्तर प्रदेशात राहणारा पुनीत कुमार यांच्या व्यवसायात सव्वा कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तुपे दाम्पत्यानी पुनीत कडे गुंतवलेले पैशांची मागणी केली असता तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. पुनीतकडून पैसे वसूल करून देण्याचे काम भाचा मंगेश थोरात याला दिले. पुनीत सोबत झालेल्या कराराची कागदपत्रे तुपे दाम्पत्यानी मंगेशला दिलेली होती.

हे ही वाचा:

येरवाडा कारागृहात आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण

“अरब देश पाकिस्तानऐवजी भारताची निवड करतायत”

अबुधाबीनंतर बहरीनमध्ये साकारणार भव्य हिंदू मंदिर

बबन घोलप यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र!

मंगेश याने या कराराच्या आधारावर तसेच तुपे दाम्पत्या सोबत झालेल्या मोबाईल वरील संभाषणाचे रेकॉर्डिंग याचा गैरफायदा घेत तुपे दाम्पत्याना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची भीती घालून तसेच बदनामी करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन व्यवसायासाठी उसने दिलेले ६१लाख रुपये परत मागू नये तसेच त्याला आणखी एक कोटी रुपये द्यावे अशी मागणी करू लागला. भाच्याकडून वारंवार येणाऱ्या तक्रारीमुळे तणावात असलेल्या तुपे दाम्पत्यानी अखेर ठाणे खंडणी विरोधी पथक या ठिकाणी मंगेश थोरात यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.

खंडणी विरोधी पथकाने खंडणीची गुन्हा दाखल करून आरोपी याला खंडणीची रक्कम घेण्यासाठी खारघर नवीमुंबई येथे बोलविण्यासाठी तुपे दाम्पत्य यांना सांगितले. दरम्यान खंडणी विरोधी पथकाने खारघर टोलनाका येथे सापळा रचून एक कोटीची खंडणी स्वीकारताना मंगेश थोरात याला अटक केली. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून तुपे दाम्पत्यानी व्यवसायात गुंतवण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांबाबत तपास सुरु आहे.

Exit mobile version