शस्त्रास्त्र साठ्यासह एकाला केले जेरबंद

शस्त्रास्त्र साठ्यासह एकाला केले जेरबंद

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनाधिकृतपणे शस्त्रास्त्र विक्री प्रकरणात गेल्या ८ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून १० पिस्तुले, २ मॅगजीन व ६ जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

हे शस्त्र मुंबईत घातपाताच्या उद्देशातून आणण्यात आले असावे, अशी संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे दोन सहकारी पळून जाण्यास यशस्वी झाले असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

हे ही वाचा:

कोरोनामुळे त्या वकिलांनी सोडला पेशा

काँग्रेसला पुन्हा स्वबळाची आठवण

मुख्यमंत्री लवकरच घराबाहेर पडणार

कोण होतीस तू? काय झालीस तू??

मुंबई पोलिसांच्या युनिट ७ ला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पूर्व द्रुगती मार्गावरील मिठागर गेट येथे सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी, एक व्यक्ती पाठीवर बॅग अडकवून या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. याच दरम्यान संबंधित व्यक्तीला भेटण्यासाठी आणखी दोन व्यक्ती घटनास्थळी आल्या. या तिघांमध्ये चर्चा सुरू झाली. पोलिसांनी तिघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत यातील २ आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र पाठीवर बॅग अडकवलेला आरोपी लाखन सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून १० पिस्तुले, २ मॅगजीन व ६ जिवंत काडतुसे असा ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .

अटक करण्यात आलेला आरोपी लाखन सिंग हा स्वतः देशी बनावटीची शस्त्र बनवण्यामध्ये माहीर असून, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसारख्या शहरांमध्ये तो अनधिकृतपणे या शस्त्रांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान शस्त्रविक्री करणाऱ्या या टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Exit mobile version