पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या एकाला बेंगळुरूहून अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव जयसिंहा राजपूत असे आहे. मुंबई सायबर विभागाने ही कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात विशेष तपास समिती नेमण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधिमंडळात सांगितले.
आरोपी हा सुशांतचा फॅन असल्याचे कळते. आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअपवरून ही धमकी देण्यात आली होती.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितले की, ही धमकी असेल तर गंभीर आहे. पण असे धमकी देणारे कुठल्याही राज्यातला असेल तरी त्याच्यावर कारवाई व्हावी. एसआयटीच्या माध्यमातून धमकी प्रकरणाची चौकशी करणार.
यासंदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, महापौर किशोरी पेडणेकर व आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमक्या एकमेकांशी संबंधित आहेत का याचा तपास केला जाईल.
हे ही वाचा:
आणखी एक मुंडे आता राजकारणात उतरणार!
भारताच्या शत्रूंवर कोसळणार ‘प्रलय’
मोदींचा फोटो आणि ढोंगबाजांचा अजेंडा
ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’
देसाई म्हणतात, गृहविभागाने धमकीची दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. आमच्याकडून त्या आरोपीची चौकशी व तपास होईल. आगाऊपणा केला असेल तरीही त्याला शासन होईल. त्याची पार्श्वभूमी तपासली जाईल.
अशा धमक्या सलग येत आहेत याबद्दल देसाई म्हणाले की, एकमेकांशी या धमक्यांचा संबंध आहे का, हे वरिष्ठ अधिकारी तपासतील व कडक कारवाई करू.