श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करायचे त्यानंतर त्याला सोडवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागायची आणि खंडणीची रक्कम मिळाली कि, गावाला पळून जायचे असा प्रकार नाशिकमधील योगेश मोगरे खून प्रकरणात झाला आहे. नाशिकमधील रोहिणी इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मोगरे हे २३ तारखेच्या रात्री पावणे आठ वाजता पांडवलेणी इथल्या बोगद्यातून सर्व्हिस रोडवरून घरी जात होते. वाटेत ते सिगरेट पिण्यासाठी पानटपरीवर थांबले होते. त्याचवेळेस पांडवलेणीकडून आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले.
त्यानंतर त्यांची गाडी चोरून नेली. उपचारादरम्यान योगेश मोगरे यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात इंदिरानगर पोलिसांनी जबरी चोरी बरोबरच खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला. योगेश मोगरे यांच्या कंपनीतील कर्मचारी, अधिकारी, कुटुंबीय आणि नातलगांची चौकशी करण्यात आली. गुन्हे शाखा नंबर दोनचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला होता. कोणताही पुरावा नसताना घटनास्थळाच्या मार्गावरील सीसीसीटीव्ही फुटेज तपासून, संशयितांना थोड्याशा माहितीवरून गुन्हा शोधून काढला. मोगरे यांची चोरलेली गाडी बेळगाव मधल्या कुऱ्हे परिसरातून जप्त करण्यात आली. घटनास्थळापासून ८० किलोमीटरच्या अंतरावर एक पिशवी मिळाली असून त्या पिशवीमध्ये काही कपड्यांची खरेदी केल्याची आणि त्या कपड्यांची पावती त्यामध्ये मिळाली.
हे ही वाचा:
‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात
पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात
संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले
रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा
त्या पावतीवरती एक मोबाईल क्रमांक होता पण त्यातील एक क्रमांक हा पुसट होता. म्ह्णून अडचण होत होती. पण पोलिसांनी शक्कल लढवून तपास केला असता मुख्य आरोपी समोर आला. त्या क्रमांकाचे लोकेशन मुंबई, नाशिक, आणि हरियाणा असे दिसून येत होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अजून वाढला. त्यानुसार पोलसांनी नाशिक रोड परिसरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी शोधून काढले.
आरोपीचे शेवटचे लोकेशन हरियाणा दिसत होते त्याला त्यामुळे त्याला हरियाणामधून अटक करण्यात आली.दोन संशयितांपैकी १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला अटक केल्यावर मुख्य संशयित अजितसिंग सत्यवान लठवाल याच्या मागावर दोन पथके तैनात करण्यात आली असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले आहे.