मुलींचे व्हिडीओ काढल्याप्रकरणी शिमल्यातून एकाला अटक

वसतिगृहात आंघोळ करताना मुलींचा व्हिडिओ बनवून शिमल्यात राहणाऱ्या मित्राला पाठवल्याचा आरोप तरुणीवर आहे.

मुलींचे व्हिडीओ काढल्याप्रकरणी शिमल्यातून एकाला अटक

चंदीगड विद्यापीठातील व्हिडिओ लीक प्रकरणी शिमला येथून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. यापूर्वी पंजाब पोलिसांनी चंदीगड विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला अटक केली होती. वसतिगृहात आंघोळ करताना मुलींचा व्हिडिओ बनवून शिमल्यात राहणाऱ्या मित्राला पाठवल्याचा आरोप तरुणीवर आहे.

चंदीगड विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने ६० मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तिने तो व्हिडीओ एका तरुणाला पाठवून दिला. त्या तरुणाने तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हायरल व्हिडिओची माहिती समोर येताच यातील काही मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी ज्या मुलीने व्हिडीओ काढला तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने शिमल्यात एका तरुणाला व्हिडीओ पाठवल्याची माहिती दिली. त्यावेळी त्या तरुणीने आपण त्या मुलाला ओळखत नसल्याचे सांगितले आहे मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार ती तरुणी त्या तरुणाला ओळखत होती.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी विदर्भात निवडणूक तयारीचे दिले आदेश

मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम

होस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

आरोपी तरुणाच्या शोधात पंजाब पोलीस शिमल्यात पोहोचले होते. तरुणीने तिच्या मोबाईलमधील आरोपी तरुणाचा फोटोही दाखवला होता.पंजाब पोलिसांनी सांगितले होते की, विद्यार्थिनी शिमल्यात राहणाऱ्या आरोपी तरुणाला चांगलाच ओळखत होता. विद्यार्थ्याच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर उर्वरित माहिती बाहेर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Exit mobile version