शालेय आहारातून स्वतःचे ‘पोषण’ करणाऱ्याला बेड्या

शालेय आहारातून स्वतःचे ‘पोषण’ करणाऱ्याला बेड्या

महापालिका शाळेतील मध्यान भोजन हा एक चर्चेचा विषय आहे. या भोजनाविषयी अनेक तक्रारी मध्यंतरीच्या काळात येत होत्या.

असे असले तरीही, याच विभागातील एकाला लाच घेण्यासाठी अटक करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिकेच्या शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या एका ठेकेदाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी २४ हजाराची लाच घेणाऱ्या शिक्षण विभागातील पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली.

राजेंद्र नरसिंगराव राजपूत (वय ४८) असे त्याचे नाव आहे. करीरोडमधील मिड डे मेल सेक्शन, त्रिवेणी संगम इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. फिर्यादी ठेकेदार हा २०१० ते २०२० या कालावधीत महापालिकेच्या विविध शाळेत मध्यान्ह जेवण योजनेंतर्गत शालेय पोषण आहार पुरवठा करीत होते. त्यातील काही बिले प्रलंबित असल्याने ते त्याबाबत मिड डे मिल्क विभागात गेले होते. त्यावेळी तेथील भंडारपाल पर्यवेक्षक असलेल्या राजेंद्र राजपूत याने त्यांना तुमच्या खात्यावर यापूर्वी २,३ लाख जमा झालेत, त्याचे १० टक्के कमिशन देण्याची मागणी केली. त्यानंतर उर्वरित बिले मंजूर करण्याचे आश्वासन दिले; मात्र त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने मुंबईच्या एसीबीकडे तक्रार दिली.

हे ही वाचा:

मच्छिमारांचा आक्रोश कुणी ऐकत आहे का?

राष्ट्रकुल सुवर्ण विजेते,महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख कालवश

कॅमेरामन सौंदडे यांचे म्युकरमायकोसिसमुळे निधन

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

शिक्षण विभागाच्या करी रोड येथील त्रिवेणी संगम बिल्डिंगच्या कार्यालयात छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईने पालिकेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली. पथकाने रचलेल्या सापळ्यानुसार आज राजपूतच्या कार्यालयात गेले. तो २४ हजार रुपये स्वीकारत असताना त्याला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याला पैसे देण्यासाठी पथकाने भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या २० नोटा तर २८ खेळण्यातील नोटा वापरल्या होत्या. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी वर्गाने सापळा रचल्यानंतर राजपूत यांना अटक करण्यात आली.

Exit mobile version