प. बंगालमधून दीड लाख अमेरिकन डॉलर जप्त

बीएसएफच्या जवानांनी चलन तस्करीचा प्रयत्न हाणून पडला

प. बंगालमधून दीड लाख अमेरिकन डॉलर जप्त

बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजेच बीएसएफच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. बॉर्डर आऊट पोस्ट बेताई येथे ही कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या बीएसएफच्या जवानांनी चलन तस्करीचा प्रयत्न हाणून पडला आहे. या कारवाईत १ लाख ६६ हजार ९०० अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत.

पश्चिम बंगालमधील जिल्हा नादियाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर चलन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बांगलादेशात तस्करी केल्या जाणार्‍या १.३९ कोटी रुपयांचे १ लाख ६६ हजार ९०० अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत.

यापूर्वी भारत-बांगलादेश सीमेवर मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर रॅकेट चालवत असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. भारत-बांग्लादेश सीमेवर राहणारे मानवी तस्कर सीमेपलीकडून तस्करी केलेल्या व्यक्तींसाठी बनावट भारतीय ओळख दस्तऐवज बनवण्याची मोठी फसवणूक करतात, असे एनआयएकडून सांगण्यात आले होते.

हे ही वाचा:

श्रमजीवी बॉम्बस्फोट प्रकरणात दोघांना फाशी

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची मदत?

न्यूजर्सीमधील मशिदीबाहेरील गोळीबारात इमामाचा मृत्यू

इराणमधील स्फोटात १०३ जणांचा मृत्यू

मानव तस्कर बांगलादेशातील लोकांची स्थानिक ओळख सुनिश्चित करण्यासाठी आधार कार्डपासून ते मतदार कार्डापर्यंत अशा सर्व बनावट कागदपत्रांची व्यवस्था करतात, असे देखील एनआयएने सांगितले होते. दरम्यान चलन तस्करीचा प्रयत्न झाल्यामुळे सुरक्ष यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Exit mobile version