24.3 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामानव वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणींसह आईची हत्या

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणींसह आईची हत्या

पोलिसांकडून २४ वर्षीय मुलाला अटक

Google News Follow

Related

नवीन वर्षाच्या पहिल्याचं उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहर हत्याकांडाने हादरलं असून एका हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये चार बहिणी आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय मुलाला केली असून त्याचे नाव अर्शद आहे. कौटुंबिक वादातून या पाच जणांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पाच जणांच्या मनगटावर जखमा असून त्यांचे कपडे रक्ताने माखलेले आढळून आले आहेत. अर्शदने जेवणात मादक पदार्थ मिसळून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच कुटुंबातील काही सदस्यांचा गळा दाबून खून करण्यात आला तर बाकीच्यांची ब्लेडने हत्या करण्यात आली आहे. गुन्हा केल्यानंतर अर्शदने स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करत सांगितले की, त्याचे शेजारी आग्रा येथील त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवून आहेत आणि आपल्या बहिणींना हैदराबादला विकण्याची योजना आखत आहेत. आपल्या कुटुंबाच्या भवितव्याच्या भीतीने अर्शदने सांगितले की त्याने आपल्या आई आणि बहिणींना यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांची हत्या केली.

आग्रा येथील एका कुटुंबातील पाच सदस्य बुधवार, १ जानेवारी रोजी लखनऊ शहरातील नाका परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले. मृतांमध्ये ४९ वर्षीय एक महिला आणि तिच्या चार मुलींचा समावेश आहे. या महिलेचं नाव अस्मान असून अलिशिया (१९), रहमीन (१८), अक्ष (१६) आणि आलिया (९) असं या घटनेतील चार मुलींची नावे आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून या प्रकरणी अस्मानचा मुलगा अर्शद (२४) याला अटक केली आहे. तसेच ही हत्या मुलगा अर्शदने कौटुंबिक वादातून केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

हे ही वाचा : 

संतोष देशमुख प्रकरण, आरोपीच्या अटकेसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन!

“केजरीवालांनी खोटे बोलण्याची आणि फसवणुकीची वाईट सवय सोडून द्यावी”

‘हे वर्ष नवीन संधी, अनंत आनंद घेऊन येवो’

मणिपूरच्या इंफाळमध्ये अतिरेक्यांकडून गोळीबार आणि बॉम्ब हल्ला!

हे सर्व सदस्य आग्रा येथून नवं वर्ष साजरं करण्याच्या निमित्ताने लखनऊमध्ये आले होते. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी एक खोली घेतली होती. त्यानंतर त्यांनी एकत्र मिळून नवं वर्ष साजरं केलं. मात्र, त्यानंतर आई आणि चार बहि‍णी मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेत अर्शदसह त्याच्या वडिलांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण ही घटना घडल्यानंतर अर्शदचे वडील फरार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा