काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादावर निकाल जाहीर केला होता. या निकालात न्यायालयाने मुस्लिम विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावत, हिजाब बंधनकारक नसल्याचे सांगितले होते. आता हा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांनाच धमकी देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
कर्नाटक हायकोर्टाच्या तीन सदस्यीय पीठाने हिजाब वादाचा निकाल दिला होता. या निकालात उच्च न्यायालयाने, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, त्यामुळे महाविद्यालयात, शाळेत येताना विद्यार्थींनींना हिजाब घालता येणार नाही. शाळा, महाविद्यालयाने जे गणवेश निश्चित केले आहेत तेच परिधान करायचे, असा निर्णय न्यायालयाने दिला. निकालानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला, आंदोलन केले. मात्र, ज्या न्यायाधीशांनी हा निकाल दिला त्या न्यायाधीशांनाच धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिरुनेलवेली येथून कोवई रहमतुल्लाह, तर एस. जमाल मोहोम्मद उस्मानी या ४४ वर्षीय व्यक्तीला तंजावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु असून, या प्रकरणात अजून कोण सामील आहे का याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
हे ही वाचा:
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं
‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’
‘२४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केली’
जगात भारी; नरेंद्र भाई! पंतप्रधान मोदी अव्वल
१५ मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालायने हिजाबवादावर निकाल दिला. या निकालानंतर कर्नाटकात अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. हिजाब न घालता परीक्षा देण्यास नकार देत परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला. तर तामिळनाडूमध्ये धार्मिक अल्पसंख्याक समुदायाने निदर्शने केली आहेत.