२६/११च्या दिवशीच आलेल्या कॉलने उडवली खळबळ; मद्यपीला अटक

५० पेक्षा अधिक अफवांचे कॉल आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे

२६/११च्या दिवशीच आलेल्या कॉलने उडवली खळबळ; मद्यपीला अटक

२६/११ च्या दिवशी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या धमकीच्या कॉलने मुंबई शहरात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली होती. पोलिसांच्या तपासात कॉल करणाऱ्याची माहिती काढण्यात आली असता एका व्यक्तीने मद्याच्या नशेत हा कॉल केल्याचे समोर आले आहे. आझाद मैदान पोलिसांनी या कॉलरला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही माहिन्यापासून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जवळपास ५० पेक्षा अधिक अफवांचे कॉल आले असून अनेक कॉल मुंबईच्या बाहेरून येत असल्याचे उघडकीस आलेले आहे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईत २६/११ हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि मृत्युमुखी पडलेल्यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येत होती.

हे ही वाचा:

नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

संजय राऊत यांना लगाम घालण्याची वेळ

उत्तर प्रदेशात बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका!

हार्दिक पंड्याची घरवापसी; पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आयपीएल

त्याच दरम्यान मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्ती व्यक्तीने कॉल करून “दोन ते तीन दहशतवादी मुंबईत घुसले आहेत आणि मानखुर्दमधील एकता नगर येथे आले आहेत. दहशतवादी काहीतरी योजना आखत आहे, या आशयाचा कॉल करून सूचना देण्यात आली.

अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तसेच संबंधित पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार देण्यात येऊन पोलिसांनी अज्ञात कॉल करणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा कॉल बोगस असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसानी कॉल करणाऱ्यांचा शोध घेऊन मानखुर्द परिसरातून अशोक ननावरे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने मद्याच्या नशेत मुंबई नियंत्रण कक्षाला कॉल करून खोटी माहिती दिल्याचे समोर आले. पोलिसांनी लक्ष्मण ननावरे याला अटक करून त्याच्याविरुद्ध भा.द.वि कलम १८२ आणि ५०५ (१) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version