पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेला घातला गंडा!

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेला घातला गंडा!

कोरोना महामारीतून आपण बाहेर पडत असतानाच काम नसल्यामुळे तोतया पोलीस बनून वयोवृद्धांची लूटमार करण्याचा एक प्रकार समोर आला आहे. दररोज अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद मोठ्या प्रमाणात पोलीस स्थानकांत होत आहे. संबंधित गुन्हेगार हे पीडितांना खोट्या प्रकारचे आश्वासन देऊन बोलण्याच्या धुंदीत मौल्यवान वस्तू लंपास करतात.

गेल्या काही दिवसात मुंबई पोलीस स्थानकात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. सायन परिसरात राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेला बोलण्याच्या ओघात गुंतवून अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याविषयी सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वयोवृद्ध महिला दमयंती तळेकर १३ जुलै रोजी मॉर्निंगवॉक साठी घराबाहेर पडल्या होत्या. पीडित वृद्ध महिलेच्या समोर दोन तरुण आले. आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करत अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यामध्ये सोन्याची अंगठी, चेन, बांगडी काढून रुमालात ठेवले. पुढे बोलण्यात गुंतवून त्या महिलेच्या हाती दुसरा रुमाल देऊन या दोघांनी पळ काढला. महिलेने व्यायाम केल्या नंतर रुमाल उघडून पाहिला असता, रुमालात स्टीलचे कडे हाती लागल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षेला फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन झालेल्या गुन्ह्याची नोंद केली.

हे ही वाचा:

श्री क्षेत्र भीमाशंकरला जोडणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते राहुल शेवाळे?

साकिनाक्यात सापडला इसमाचा कुजलेला मृतदेह, पत्नीचा शोध सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे मुख्य नेते; पक्षप्रमुखपदाची जागा रिकामी

 

गुन्हेशाखेतील पोलीस असल्यासागे सांगून विलेपार्ले येथील व्यावसायिकाला दादर येथे भरदिवसा दोन ठगांनी गंडा घातल्याचे दिसून आले. सिद्धिविनायक येथे एका वृद्ध नागरिकाच्या गाडीत ५ किलो गांजा चरस आणि ४ लाख रुपये रोकड सापडली असून, आम्हाला तुमच्या गाडीची तपासणी करायची आहे. असे सांगून चोरांनी लूट केली. संबंधित घटनेचा दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

अशाच एका घटनेत पोलीस असल्याची बतावणी करत विक्रोळीतील ७० वर्षीय वृद्धांचे ६० हजार किमतींचे दागिने चोरांनी कन्नमवार येथून लंपास केले. परब ह्यांच्या सांगण्यावरून विक्रोळी पोलिसांनी ठगाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मॉर्निंगवॉक, देवदर्शनाला एकट्या निघालेल्या ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर लक्ष्य होताना दिसत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तोतया पोलिसांकडून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version