पत्नी आणि मुलीच्या आजारपणाला कंटाळलेल्या ८९ वर्षीय वयोवृद्धाने ८१ वर्षीय पत्नी आणि ५५ वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना पश्चिम उपनगरातीलअंधेरी पूर्वेत घडली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मेघवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून वयोवृद्धाला अटक केली आहे. मी त्यांना आजारपणापासून मुक्त केल्याची अटक करण्यात आलेल्या वयोवृद्धाने पोलिसांना दिली आहे.
पुरुषोत्तम सिंग गंडहोक (८९) असे अटक करण्यात आलेल्या वयोवृद्ध इसमाचे नाव आहे. जोगेश्वरी पूर्वेतील शेर- ए- पंजाब कॉलनीतील प्रेमसंदेश सोसायटीच्या २क्रमांक प्लॅट मध्ये पत्नी जसबीरकौर (८१) आणि मानसिक विकलांग असणारी मुलगी कमलजीतकौर (५५) मुलीसोबत राहण्यास होते. पुरुषोत्तम यांची ५८ वर्षाची विवाहित मुलगी गुरबीदरकौर त्याच परिसरात राहण्यास आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुरुषोत्तम याने मोठी मुलगी गुरबीदंरकौर हिला फोन करून कळवले की,”मैंने तुमारी माँ, जसबीरकौर ओर बहेण कमलजित को खत्म कर दिया है। क्योंकि मुझे उनका दुःख सहन नही हो रहा था और उनका देखभाल करना भी मुझसे नहीं हो रहा था।” असे बोलून त्यांनी फोन कट केला.
हे ऐकताच गुरबिंदरकौर ही आपल्या मुलासह वडीलाच्या घरी आली असता घराचा दरवाजा आतून बंद होता, तिने आणि वडिलांना जोर-जोरात आवाज दिला असता, त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला व “आप पुलिस को बुलाव, पुलिस आनेपर ही मैं दरवाजा खोलूगा” असे सांगितले.
काही वेळाने मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पुरुषोत्तम याने दार उघडले. पोलिसांनी आत जाऊन बघितले असता बेडरूम मध्ये जसबीरकौर आणि कमलजीतकौर यांचे मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुरुषोत्तम याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
हे ही वाचा:
देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!
इन्हें आईना मत दिखाओ…वो आईने को भी तोड़ देंगे
अरुणाचलमध्ये हिमस्खलनात लष्कराचे सात जवान अडकले
ठाण्यात भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले
याप्रकरणी त्याच्याकडे चौकशी केली असता “पत्नी और बेटी की बिमारी से मै परेशान था, उनका दुख देखा नहीं जा रहा था, इस लिये उनको मुक्ती देदी मैने” अशी धक्कादायक कबुली त्याने पोलिसांकडे दिली. याप्रकरणी पोलिसानी हत्येचा गुन्हा दाखल करून पुरुषोत्तम याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास मेघावाडी पोलीस करीत आहे.