घर घेण्यासाठी वृद्ध दाम्पत्य पैशाची जमवाजमव करत होते, जादूटोणा करून पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून या टोळीच्या संपर्कात आले. या टोळीने वेगवेगळे तंत्र-मंत्र बोलून मडक्यात ठेवलेले पैसे दुप्पट होतात, असे प्रात्यक्षिक दाखवून दाम्पत्याला जाळ्यात ओढून घेतले. संबंधित घटनेचा प्रकार दहिसर पोलिसांनी उघडकीस आणून, मुंबईसह इतर भागातून ५ आरोपीना अटक केली आहे. चौकशीअंती अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दहिसर येथील अरविंद आणि अरुणा वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलीच्या घरी राहात होते. अरुणा यांची माहेरची संपत्ती विकली असता, ६७ लाख रुपये मिळाले होते. या रकमेच्या व्याजावर दोघेही आपला उदरनिर्वाह चालवत होते. दादर परिसरात घर घेण्यासाठी शोध सुरु केला असता त्यांची प्रिया आणि अजित नावाच्या इस्टेट एजन्टसोबत त्यांची ओळख झाली. साताऱ्यामध्ये गणेश पवार नावाचा व्यक्ती तंत्र-मंत्र बोलून पैसे दुप्पट करतो असे सांगितले. या दाम्पत्यांनी इस्टेट एजन्ट वर विश्वास ठेवून साताऱ्याला गेले.
हे ही वाचा:
विरोध ईडीला, भ्रष्टाचाराला नाही!
बॅडमिंटन सम्राज्ञी पीव्ही सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेत हाती धरणार तिरंगा
‘कांजूरमार्ग’ मेट्रो स्थानकाची ‘उंच’ भरारी!
सोनिया गांधी माफी मांगो…मुंबईत भाजपाची निदर्शने
मांत्रिक पवार याने मंत्रजप करून, मडक्यातून पैसे काढून दाखवले. हे बघताच वृद्ध दाम्पत्याने २५ लाख रुपये रक्कम दिली. ती एका पेटाऱ्यात ठेवली आणि तीन दिवसांनी उघडण्यास सांगितली. मांत्रिकांनी हातचलाखी करून ते पैसे अगोदरच काढून घेतले होते. नंतरही वृद्ध दाम्पत्याने अजून पैसे दिले. मात्र तेही पैसे मिळाले नाहीत.