…आणि वृद्धाला शंभर रुपयांची थाळी पडली लाखाला!

…आणि वृद्धाला शंभर रुपयांची थाळी पडली लाखाला!

एका वृद्ध व्यक्तीला अवघ्या १०० रुपयात एका थाळीसह दोन मोफत थाळ्या मिळणार असे दाखविण्यात आलेले आमिष चांगलेच महागात पडले. ही फेसबुकवरील बनावट जाहिरात त्याला चांगलीच महागात पडली आहे.

फक्त शंभर रुपयेच्या थाळीसाठी त्याला लाखभर रुपयाचा गंडा घातला गेला आहे. एनडी नंद ( ७४) असे या व्यक्तीचे नाव असून, ते मुंबईतील खार भागातील रहिवाशी आहेत. त्यांनी फेसबुकवर ही बनावट जाहिरात पाहिली. पाहिलेल्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला होता की, क्रेडिट कार्डद्वारे फक्त दहा रुपये भरायचे आणि उर्वरित ९० रुपये डिलिव्हरीच्या वेळी भरावे लागतील. तसेच एका थाळीसह आणखी दोन थाळी मोफत दिल्या जातील. असे या बनावट जाहिरातीत लिहाले होते. अशा या जाहिरातीने नंद यांना भुरळ पडली.

एन.डी. नंद यांनी सांगितले की, ही घटना त्यांच्यासोबत १९ जानेवारीला घडली होती. त्याला एक फोन आला. फोनवरील त्या व्यक्तीने आपले नाव दीपक असे सांगितले. त्या बनावट दीपकने नंद यांना क्रेडिट कार्ड ची माहिती विचारली. आणि कार्डमधून फक्त दहा रुपये कापले जातील व उर्वरित रक्कम ९० रुपये रोख द्यावे लागतील असे त्याला सांगण्यात आले.

हे ही वाचा:

‘मुंबई महापालिकेत भाजपचेच कमळ फुलणार’

…म्हणून महाराष्ट्रातील चार मुलांना मिळाला राष्ट्रीय बाल पुरस्कार

देशविरोधी भाषण करणाऱ्या शर्जिल इमामविरोधात देशद्रोहाच्या खटल्याचे आदेश

मंत्रालय येथील पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडली

 

त्यानुसार नंदने त्याची क्रेडिट कार्डची माहिती त्याला दिली. आणि काही क्षणातच पीडितेच्या कार्डद्वारे दोन वेळा ४९ हजार ७६० कापले गेले. पीडित नंदसोबत एकूण ९९ हजार ५२० रुपयांची फसवणूक झाली आहे. आत्तापर्यंत पोलिसांना आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नसून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.

Exit mobile version