डॉलरच्या बदल्यात चक्क रिन साबणाच्या वड्या

डॉलरच्या बदल्यात चक्क रिन साबणाच्या वड्या

भाईजान म्हणून हाक मारून एका व्यापाऱ्याला दोन महिलांनी चक्क पाच लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या महिलांनी अमेरिकन डॉलरच्या नावाखाली रिन साबणाच्या वड्या वर्तमान पत्रात गुंडाळून दिल्याची घटना मुंबईत उघडकीस आली. नेहरू नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही महिलांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील मनीष मार्केट परिसरात राहणारे मोहम्मद नईम शेहरिन खान (६२) हे कपड्याचे व्यापारी आहे. काही दिवसांपूर्वी पायधुनी येथील एका दुकानातून सामान घेऊन निघालेल्या मोहम्मद खान यांना दोन महिलांपैकी तिशीतील एका महिलेने ‘भाईजान भाईजान रुको ना, म्हणून हाक मारत थांबावले. तिने या व्यापाऱ्याला या वृद्ध महिलेकडे १० ते २० डॉलरच्या १७०० नोटाआहे, ज्याची किंमत ९ लाख रुपये आहे. तुम्ही त्या चालवून आम्हाला केवळ सात लाख रुपये द्या बाकी तुम्ही ठेवा. या महिलेकडे डॉलर कुठून आले असे व्यापारी नईम यांनी विचारले असता ती बंगळुरूमध्ये एका वृद्ध महिलेकडे कामाला होती. त्या महिलेकडे अमेरिकन डॉलर होते तिचे निधन झाले आणि हे डॉलर घेऊन ती मुंबईत आली असे तिने सांगितले.

तुम्हाला पाहिजे असल्यास कुर्ला पूर्व येथे भेटा असे सांगितले, परंतु मला कुर्ल्याला येता येणार नाही असे सांगताच या महिलेने दादर येथे बोलावून घेतले.

दादरला या महिलेने २० डॉलर ची एक नोट देत तुम्ही तपासून बघा नंतर बाकीच्या घ्या असे सांगून व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून २० डॉलर ची नोट दिली. व्यापारी आपल्या जाळ्यात अडकल्याचे समजताच तिने स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला आणि उद्या कुर्ला येथे बाकीचे डॉलर घेण्यासाठी या सोबत पैसे घेऊन या असे सांगितले. व्यापाऱ्याने मस्जिद बंदर या ठिकाणी डॉलर तपासले असता ते खरे असल्याचे सांगण्यात आल्यानंतर व्यापारी दुसऱ्याच दिवशी कुर्ला या ठिकाणी या महिलेला भेटण्यासाठी गेले. या महिलेने सर्व डॉलर घ्या व उर्वरित २ लाख रुपये नंतर आम्ही ऑफिसला आल्यावर घेऊ असे सांगून व्यापाऱ्याकडे पाच लाख रुपयाची रोकड घेऊन एक पिशवी व्यापाऱ्याच्या हातात दिली. व्यापाऱ्याने पिशवी उघडून तपासत असताना घरी जाऊन तपासा नाहीतर आपण पकडले जाऊ असे सांगितले आणि दोघी पैसे घेऊन तेथून निघून गेल्या.

हे ही वाचा:

आदित्यजी, अजित दादांकडे राज्याचं नेतृत्व द्या

अधिवेशनाचे पाचही दिवस मुख्यमंत्र्यांची दांडीच

काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते भाजपात सामील

जितेंद्र आव्हाड म्हणतात, कालिचरण महाराजांना ठेचून काढा!

 

काही अंतरावर गेल्यावर व्यापाऱ्याने पिशवी उघडून बघतली असता त्याला धक्काच बसला वर्तमान पत्राच्या कागदात चार रिन साबणाच्या वड्या होत्या. आपली फसवणूक झाल्याचे कळताच व्यापाऱ्याने या दोघीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्या केव्हाच गर्दीत मिसळून पळून गेल्या होत्या. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघींचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Exit mobile version