पाकिस्तान सरकारचे @GovtofPakistan’ अधिकृत ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. कायदेशीर मागणीवरून ट्विटरने पाकिस्तान सरकारचे भारतातील खाते ब्लॉक केले आहे. या कारवाईनंतर भारतातील लोक हे खाते पाहू शकणार नाहीत. परंतु अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये हे अकाउंट पाहता येणार आहे.पाकिस्तान सरकारचे अधिकृत ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याची गेल्या काही महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अकाऊंट यापूर्वी जुलैमध्ये देखील ब्लॉक करण्यात आले होते आणि नंतर ते पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आले होते.
भारतातील एखाद्या व्यक्तीने पाकिस्तान सरकारच्या ट्विटर उघडताच “पाकिस्तान सरकारचे हे ट्विटर खाते एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.” असे उत्तर बघायला मिळत आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले होते. एखाद्या देशाच्या न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाला किंवा वैध कायदेशीर मागणी केल्यास आपल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ट्विटर अशी कारवाई करते. ही कारवाई देखील त्याच धोरणांतर्गत करण्यात आली आहे. सध्या पाकिस्तान सरकारचे पाकिस्तान सरकारचे ट्विटर खाते भारतीय वापरकर्त्यांना दिसत नाही.
गेल्या वर्षी जूनमध्ये, ट्विटरने भारतातील संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासांच्या अधिकृत खात्यांवर बंदी घातली होती. ऑगस्टमध्ये भारताने आठ युट्युब वृत्त वाहिन्यांना ब्लॉक केले होते. यामध्ये पाकिस्तानकडून चालविण्यात येणारे युट्युब चॅनल आणि एक बनावट भारताच्या विरोधात आपत्तीजनक मजकूर पोस्ट करणाऱ्या एका फेसबुक अकाउंटचा समावेश होता.
हे ही वाचा:
संजय राऊतांना १००० रुपयांचा दंड; आरोप केले पण न्यायालयात हजरच नाही!
बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक
आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी
कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये होणार निवडणुका
माहितीनुसार, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल ट्विटरने जुलै २०२२ मध्ये भारतीय वापरकर्त्यांची ४५,१९१ खाती बंद केली होती. ट्विटरने आपल्या मासिक अनुपालन अहवालानंतर ही कारवाई केली. विशेष म्हणजे ट्विटर कंटेंट ब्लॉकिंगबाबत केंद्र सरकारच्या नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे.