सध्या सोशल मीडियावर एक बातमी प्रचंड व्हायरल होत आहे. ती बातमी आहे दारुबंदी विभागाच्या एका अधिकाऱ्याचा दारू पिऊन मृत्यू.
महाड येथे घडलेली ही घटना आहे. या घटनेमध्ये महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन होते, त्यापायी त्याला जीव गमवावा लागला. महाड ग्रामीण रुग्णालयात ४.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
महाड शहर पोलिसांच्या माहितीनुसार बालाजी शिवाजी माने हे महाड येथील दारूबंदी कार्यालयात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणून काम करत होते. त्यांना दारू पिण्याची सवय होती. पण दारुबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू दारू पिऊनच झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सध्या त्यांच्या मृत्यूची बातमी सगळीकडे व्हायरल होत असून एका दारूबंदी अधिकाऱ्याला दारू पिण्याचीच सवय होती तर तो दारूबंदीसाठी कसे प्रयत्न करत असेल असा सवाल लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.
हे ही वाचा:
विरारच्या तरुणाने भारताचा झेंडा अटकेपार रोवला
महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार…
‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली
ही बातमी सोशल मीडियावर चर्चेत असून त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा विषय गंभीर असला तरी अनेकांनी त्या घटनेची थट्टाही उडविली आहे. एक दारूबंदी अधिकारीच दारू पिऊन मृत्यूमुखी पडत असेल तर सरकारच्या या योजनेचे तीनतेराच वाजतील अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत.