महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर याठिकाणी १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा गोळीबारात मृत्यू झाला. मध्यंतरी शनि शिंगणापूर येथे सोने आणि चांदी यांचे दान त्यांनी केले होते. १.७ किलो सोने आणि ५ किलो चांदीचा कलश यांनी शनि शिंगणापूरला दिला होता.
ब्रजरानगर येथील बीजू जनता दलाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी ते जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. गाडीत बसत असतानाच त्यांच्या छातीत गोळी मारण्यात आली. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना गाडीतून नेण्यात येत असल्याचा व्हीडिओ समोर आला. गोपालचंद्र दास या पोलिस अधिकाऱ्याने हा गोळीबार केला असल्याचे स्पष्ट झाले. त्या गोळीबारानंतर छातीवर हात धरून नबा दास तिथेच कोसळले होते.
हे ही वाचा:
ठाकरे गट हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे?
अर्थसंकल्पात या गोष्टींमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत
भारतात ८० टक्के हिंदू त्यामुळेच पठाणही हिट होऊ शकतो!
पद्म पुरस्कारांचा दाखला देत मोदींनी केले आदिवासी समाजाचे कौतुक
जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. झारसुगुडा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पण घाव वर्मी लागल्यामुळे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रुग्णालयाला भेट देऊन दास यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही धीर दिला होता.
या घटनेमुळे ओदिशात खळबळ उडाली असून राज्याच्या आरोग्य मंत्र्यावर अशा पद्धतीने हल्ला कसा होतो, याबद्दल प्रश्नही उपस्थित केले गेले. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीची सध्या चर्चा सुरू आहे. शिवाय, एका पोलिस अधिकाऱ्याने हा हल्ला का केला, याचाही तपास आता केला जाणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून आपल्या पक्षासाठी दास हे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे अनन्वित नुकसान झाले आहे.