कामावर जाण्याच्या घाईपोटी नर्सला गमवावे लागला हात-पाय

मालगाडीखालून जाण्याचा केला होता प्रयत्न

कामावर जाण्याच्या घाईपोटी नर्सला गमवावे लागला हात-पाय

रूळ ओलांडत असताना मालगाडीच्या खाली येऊन सायन रुग्णालयातील नर्सला एक हात आणि एक पाय कायमचा गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आसनगाव रेल्वे स्थानकात घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसानी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

विद्या वाखारीकर (५४) असे या दुर्देवी नर्सचे नाव आहे. विद्या वाखारीकर आसनगाव येथे कुटुंबासह राहण्यास आहे. मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी करणाऱ्या वाखारीकर दररोज आसनगाव ते सायन असा लोकल ट्रेनने प्रवास करतात. शनिवारी नेहमीप्रमाणे वाखारीकर कामावर जाण्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडल्या.

नेहमीप्रमाणे आसनगाव येथून सुटणारी ५:४४ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी फलाटवर जाण्यासाठी रेल्वेपुलावरून न जाता रूळ ओलांडत होत्या, दरम्यान एक मालगाडी थांबलेली असताना त्या बराच वेळ मालगाडी जाण्याची वाट पहात होत्या, परतू मालगाडी जात नसल्यामुळे व ५:४४ ची लोकल सुटेल म्हणून वाखारीकर यांनी मालगाडी खालून जाण्याचा निर्णय घेतला.

मालगाडी खालून जात असताना मालगाडी सुरू झाली आणि घाबरलेल्या वाखारीकर यांनी मालगाडीच्या दोन चाकातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात त्यांचा डावा पाय आणि हात चाकाखाली आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. फलाटावर तैनात रेल्वे पोलिसांनी त्यांना तात्काळ सायन रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तिचे हात आणि पाय वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर दुखापती मुळे आणि वाखारीकर यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचे हात आणि पाय हे दोन्ही अवयव कापावे लागले.

हे ही वाचा:

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा धक्का

‘एनडीआरएफ’चा बेसकॅम्प होणार रायगड जिल्ह्यातच

संसदेच्या पावसाळी सत्रातून ‘आप’ खासदार संजय सिंग निलंबित

स्पेनमध्ये ५० वर्षांनी उजव्या विचारसरणीचे सरकार येण्याची चिन्हे

“मालगाडी सुरू होईल हे त्या महिलेला कळले नाही आणि ती अचानक तिच्याखाली अडकली. दुर्दैवाने, या घटनेत महिलेला तिचा डावा पाय आणि डावा हात गमवावा लागला,” असे कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.

Exit mobile version