बापरे!! बारावी शिकलेला डॉक्टर आणि कंपाऊंडर करत होते उपचार

बापरे!! बारावी शिकलेला डॉक्टर आणि कंपाऊंडर करत होते उपचार

Close-up Of Doctor Hands With Stethoscope In Handcuffs

पुन्हा एकदा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. भिवंडीत मागे याचा पर्दाफाश झाला होता. आता घाटकोपरलाही असे डॉक्टर सापडले आहेत.

घाटकोपर येथे डॉक्टरांकडे सहायक म्हणून काम करणारे (कंपाऊंडर) आणि जेमतेम बारावी शिकलेले बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने गुन्हे शाखेच्या मदतीने घाटकोपर येथून रविवारी (१९ सप्टेंबर) तीन बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी भरत म्हस्के (४६), सूरज रामजी सरोज (२३) आणि नीलम सीताराम पासी (२३) यांना अटक केली आहे.

घाटकोपर पूर्व येथील रमाबाई कॉलनी परिसरात कोरोनाकाळात तीन बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (१८ सप्टेंबर) संध्याकाळी वारे क्लिनिक, धनिस्ता क्लिनिक आणि सरोज क्लिनिक येथे गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट रुग्ण पाठवले. ते रुग्ण तेथून उपचार घेऊन बाहेर पडले असता गुन्हे शाखेचे अधिकारी आणि महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्यांवर छापा टाकला.

हे ही वाचा:

‘वॅक्सीन मैत्री’ लवकरच पुन्हा सुरु

अफगाणिस्तानमधून आलेले ९ हजार कोटींचे हेरॉइन गुजरातमध्ये घेतले ताब्यात

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता दूर होणार

संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये

या दवाखान्यांमधील रुग्णांवर उपचार करणारे भरत, सूरज आणि नीलम यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन संकेतस्थळावरील नोंदणीबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडील प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीत ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सांगताच रविवारी या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान यांनी आधी कंपाऊंडर म्हणून काम केल्याचे उघड झाले आहे. आरोपींपैकी म्हस्के आणि सरोज यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले असून नीलम पासीने बीएएमएसच्या दुसऱ्या वर्षांत शिकत असल्याचे सांगितले. महिन्याभरात गुन्हे शाखेने आठ बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. गोवंडी येथून पोलिसांनी पाच बोगस डॉक्टरांना अटक केली होती.

Exit mobile version