रणवीरने न्यूड फोटोसेशनसंदर्भात नोंदविला जबाब

कुणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे रणवीरचे म्हणणे

रणवीरने न्यूड फोटोसेशनसंदर्भात नोंदविला जबाब

न्यूड फोटोशूटनंतर निर्माण झालेल्या वादावर आता अभिनेता रणवीर सिंगने पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडले आहे., रणवीर सिंगने हे न्यूड फोटोशूट एका आंतरराष्ट्रीय मासिक ‘पेपर’साठी केले होते, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या न्यूड फोटोशूटनंतर त्याच्यावर चाैफेर टीका झाली हाेती. त्याच्यावर एफआयआरही नोंदवण्यात आला होता. या न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिसांनी रणवीर सिंगचे जबाब नोंदवल्याबद्दल नोटीस बजावली होती.

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगने चेंबूर पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे. रणवीरने सकाळी ७ ते ९.३० या वेळेत त्यांचा जबाब नाेंदवला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग त्याच्या वक्तव्यादरम्यान स्वत:ला निर्दोष सांगत होता. कुणालाही दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असं ताे म्हणाला आहे. रणवीरने सांगितले की, अशा फोटोशूटमुळे त्याच्यासाठी त्रास होईल याची त्याला कल्पना नव्हती.

रणवीर सिंगने दोन तास चौकशी केली

रणवीर सिंग त्याच्या कायदेशीर टीमसह मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये आपले म्हणणे नोंदवण्यासाठी पोहोचला होता. पोलिसांनी जवळपास दोन तास रणवीर सिंगचा जबाब नोंदवला. पोलिसांनी रणवीरला ३० ऑगस्टला म्हणजेच उद्या हजर राहण्यास सांगितले होते. मात्र रणवीर सिंग एक दिवस आधी पोलिसात पोहोचला आणि त्याने त्याचे जबाब नोंदवले. दोन तासांच्या चौकशीदरम्यान रणवीर सिंग आणि त्याच्या कायदेशीर पथकाने पोलिसांना पुढील तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हे ही वाचा:

‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’

गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार

Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर

…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

नोटीस बजावायला घरी गेले होते पोलीस

काही दिवसांपूर्वी पोलिस त्याच्या घरी गेले होते पण तो घरी उपस्थित नव्हता, त्यानंतर त्याला २२ ऑगस्टला बोलावण्यात आले होते. चेंबूर पोलीस रणवीर सिंगला नोटीस देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. त्याला ही नोटीस १६ ऑगस्टपर्यंत सोपवायची होती, असे सांगण्यात आले, पण रणवीर घरी नसल्यामुळे पोलीस परतले. रणवीर सिंगला २२ ऑगस्ट रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल, असे नोटीसमध्ये लिहिले होते.

Exit mobile version