कुठे गायब झालाय खलिस्तानी समर्थक अमृतपाल?

बाहेर पडण्याचे मार्ग बंद . जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या सीमाही सील केल्या

कुठे गायब झालाय खलिस्तानी समर्थक अमृतपाल?

वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग अजूनही पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. त्यामुळे सोमवारी तिसऱ्या दिवशीही पंजाब पोलीस अमृतपालचा शोध घेत आहे. अमृतपाल जालंधरमध्ये लपल्याचा पोलिसांना संशय आहे.अमृतपाल सिंगच्या पाच साथीदारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा ( रासुका) लावण्यात आला आहे. अमृतपाल सिंगवर देखील लवकरच रासुका लादला लावला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. आधी अमृतपालला अटक करून पकडण्यातच आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते मात्र प्रत्यक्षात तो पोलिसांना सापडलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे

जिल्ह्यातील सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. अमृतपालच्या जल्लुखेडा गावातही फौजफाटा तैनात आहे. पंजाबच्या जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. खलिस्तान समर्थक अमृतपाल याच्याविरुद्ध रविवारी आणखी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. जालंधरच्या सालेमा गावात सापडलेल्या त्याच्या काळ्या रंगाच्या कारमध्ये अवैध शस्त्रे सापडली आहेत. रविवारी त्याच्या आणखी ३४ साथीदारांना अटक करण्यात आली. आतापर्यंत त्याच्या ११२ समर्थकांना अटक करण्यात आली आहे. अनेकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

पोलिसांकडे आयएसआयचे संबंध आणि विदेशी निधीचे पुरेसे पुरावे आहेत. या लोकांना परदेशातून पैसे पाठवल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत असे पंजाबचे पोलीस महासंचालक सुखचैन सिंग गिल यांनी म्हटले आहे. अमृतपालच्या साथीदारांकडे सापडलेली महागडी वाहने त्यांच्या उत्पन्नाच्या बाहेर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

लंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

प्रकाश सुर्वे यांचा बॅनर काढल्यावरून भाजपा कार्यकर्त्याला मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

अमृता फडणवीसांना धमकावणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या

‘सावरकर समझा क्या, नाम राहुल गांधी है’ यावरून राहुल गांधी निशाण्यावर

रविवारी रात्री उशिरा अमृतपालचे काका हरजीत सिंग आणि ड्रायव्हर यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. अमली पदार्थ तस्कराकडून विकत घेतली मर्सिडीझ कर सरेंडर करण्यासाठी अमृतपालचे काका शरण आले होते. अमृतपालच्या काकांचीही आसाममधील दिब्रुगड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ११४ जणांना अटक केली आहे.

Exit mobile version