बिहारमधील भागलपूर येथे बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर आता हाजीपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीला भेगा पडल्याचे समोर आले आहे. पुलाच्या खांबासाठी निकृष्ट साहित्याच्या वापराबद्दल इंजिनीअरला विचारले असता, तो माफी मागू लागला. मात्र या प्रकारामुळे बिहारमधील विकासकामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
राजधानी पाटणाच्या लगत असणाऱ्या हाजीपूरमधील लालगंज येथे सरकारी रुग्णालय उभे राहात आहे. मात्र या बांधकामातही हलगर्जी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. सहा कोटी ६९ लाख रुपये खर्चून येथे ३० खाटांचे, तीनमजली सरकारी रुग्णालय तयार होणार होते. या रुग्णालय इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम डिसेंबर २०२२मध्ये झाला होता. जून २०२३पर्यंत या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होणार होते. मात्र अद्याप या इमारतीचा केवळ पायाच रचला गेला आहे. ज्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हे ही वाचा:
गोराईत होणार छत्रपती शिवरायांचे वॉर म्युझियम
परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र अव्वल!
नौदलाच्या हेवीवेट टोर्पेडोने पाण्याखालील लक्ष्य अचूक वेधले
‘काँग्रेसने द्वेषाचा शॉपिंग मॉल उघडला आहे’
जेव्हा निकृष्ट साहित्याच्या वापराचा प्रश्न विचारला गेला तेव्हा कंत्राटदार आणि इंजिनीअर एकमेकांकडे बघू लागले. येथे निकृष्ट दर्जाचे साहित्य, सळ्या वापरून काम केले जात असल्याचे उघड झाले आहे. आता केवळ पायाच रचला गेला असताना खांबांवर भेगा पडू लागल्या आहेत. खांबांमधून सळ्या बाहेर येत आहेत. अशा निकृष्ट साहित्याचा वापर केल्यावर एखादा अपघात घडल्यास आणि कोणाचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण?, असा प्रश्न इंजिनीअरला विचारला असता तो माफी मागू लागला. त्यानंतर कंत्राटदार आणि इंजिनीअर एकमेकांवर दोषारोप करू लागले.