चाकू दाखवत गुजरातमधल्या मुस्लिमाने केले आक्षेपार्ह विधान
देशभरात १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होत होती. मात्र, राजकोट येथे एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. सोहिल हुसेन मोर या वकिलाने शिवजयंती दिनी आपल्या हिंदूधर्मीय शेजाऱ्यांना चाकू दाखवत देशातून निघून जाण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात हिजाब विरुद्ध भगवा असा वाद पेटला असताना आता राजकोटच्या या घटनेमुळे तिथे तणाव निर्माण झाला आहे. या वकिलाविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा, मारहाणीचा, तसेच पोलिसांना कर्तव्य बजावण्यात अडथळे आणल्याचा आरोप करत दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सोहिल हुसेन मोर याने आपल्या निवासी सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद टिप्पणी पोस्ट केली होती. त्यावर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या एक सदस्य ज्योती सोढा यांनी मोर यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. तेव्हा संतापलेल्या मोर यांनी सोढा यांना सांगितलं, की ‘आता हा देश पाकिस्तान झाला आहे आणि तुम्ही सर्वांनी देश सोडावा.’ असे संतापजनक वक्त्यव्य मोर यांनी केले.
રાજકોટમાં ધાર્મિક લાગણી દૂભાઈ તેવી શિવાજી મહારાજ વિરોધી ટિપ્પણી કરતા વિવાદ સર્જાયો.સોહિલ મોર નામના વ્યકિતએ પોસ્ટ મુકી હતી,શિવાજી મહારાજની જયંતિને લઇ મુકી હતી પોસ્ટ pic.twitter.com/BMBBDvvjNH
— News18Gujarati (@News18Guj) February 22, 2022
यानंतर सोढा यांनी मोर याची प्रत्यक्ष भेट घेतली आणि असे धार्मिक तेढ वाढवणारे, चिथावणीखोर शब्द वापरू नका असे स्पष्ट सांगितले. त्यावर मोर याने सोढा यांना चाकू दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोढा आरडाओरडा केला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
हे ही वाचा:
रशिया-युक्रेन प्रश्न चर्चेतून सोडवावा
भीमा-कोरेगाव आयोगाने पवारांची केली तासभर चौकशी!
रशिया-युक्रेन संकटामुळे शेअर बाजार कोसळला….
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये दोन दहशतवादी अटकेत
यांच्या संभाषणाचा एक वायरल ऑडिओ रेकॉर्डिंग News18Gujarati चॅनेल ने शेअर केले आहे. यामध्ये यामध्ये सोहिल हुसेन मोर हे ‘हा देश आता पाकिस्तान बनला आहे. इथले सगळे नागरिक मुस्लीम आहेत. सर्व हिंदूंनी निघून जावं,’ असं कोणालातरी रागारागाने सांगत असल्याचं ऐकू येतं. त्यावर त्या समोरच्या महिलेने ते असे का म्हणत आहेत, असं विचारल्यावर तो पुन्हा रागारागानं म्हणाला, की ‘हेच खरं आहे, आता तुम्ही निघून जा.’