महाराष्ट्रात बलात्कारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी बलात्कार केल्याच्या संतापजनक घटनेनंतर आता कल्याणमध्येही बलात्काराची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पाठोपाठ कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षिकेच्या पतीने ८ वर्षीय बलिकेवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसानी आरोपी मुदर तालवाला याला अटक केली आहे.
एका मुलीचे शिकवणी मुदर हा घेत होता. पण शिक्षिका घरी नसताना त्याने ती संधी साधून त्याने बालिकेवर लैगिंक अत्याचार केला.
मुलीने शिकवणीला जाण्यास मनाई केल्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली आणि कल्याण या दोन्ही घटना एकाच परिमंडळात येतात.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या बलात्कारांच्या घटनेने संतापाचे वातावरण आहे. पुण्यात १४ वर्षांच्या मुलीवर १३ जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुंबईत अंधेरी, साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार झाला होता. त्यात महिलेचा मृत्यू झाला. पुण्यात दिराने वहिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना रविवारी घडली. त्यानंतर अमरावतीतही बलात्काराची घटना घडली होती.
हे ही वाचा:
चार वर्षांपूर्वी अपघात झालेल्याच्या कुटुंबियांना मिळाले ८७ लाख
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे होते ३३ जण
लस येता घरा, तोचि दिवाळी दसरा; घरोघरी लसीकरणाचा मोदींचा निर्णय
दहाचे नाणे देताना येतायत नाकीनऊ… वाचा!
या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून या परिस्थितीबद्दल चिंता प्रकट केली तसेच दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्याची विनंती केली. पण त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून इतर राज्यांत काय चालले आहे तेही बघा असा सवाल विचारला होता.