परमबीर सिंग यांची लाचलुचपत विभागाकडून ‘ओपन एन्क्वायरी’

परमबीर सिंग यांची लाचलुचपत विभागाकडून ‘ओपन एन्क्वायरी’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबी सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजून एका प्रकारणात “ओपन एन्क्वायरी” केली जाणार आहे..”ओपन एन्क्वायरी” करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली असून लवकरच या “ओपन एन्क्वायरी”ला सुरुवात होणार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांच्या विरोधात याआधी एका प्रकरणात चौकशी सुरू आहे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग वर आरोप लावले होते. गेल्यावर्षी जेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले होता तेव्हा परमबीर सिंग यांनी त्यांच्या एका माणसाच्या माध्यमाने अनुप डांगे यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा:

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसची आत्महत्या

का आहे मुंब्रा दहशतवाद्यांचा अड्डा?

निर्दयी पित्याने केली चिमुरड्याची रेल्वे फलाटावर आपटून हत्या

क्वाड बैठकीपूर्वी मोदी-मॅक्रॉन संभाषण

दुसरी चौकशी ही पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांच्या तक्रारीनंतर सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांची चौकशी करण्यासाठी बी.आर. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, लाचलूचपत प्रतिबंधक विभागला पत्र लिहिलं होतं…बी आर घाडगे हे तेच अधिकारी आहेत ज्यांच्या तक्रारीनंतर परमबीर सिंग वर सर्वप्रथम एप्रिल महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. परमबीर सिंह यांच्यावर अपराधी षड्यंत्र, पुरावे नष्ट करणे आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Exit mobile version