पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्येची तिसरी घटना!

पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्येची तिसरी घटना!

हरयाणात नूंह जिल्ह्यात डीएसपी सुरेंद्र बिश्नोई यांना ठार मारण्यात आल्यानंतर २४ तासांत झारखंडमध्ये एका महिला पोलिसाची हत्या करण्यात आली. आता गुजरातच्या आणंद येथे एका पोलिसावर ट्रक चालवून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे या माफियागिरीविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

देशात गेल्या २४ तासात तीन पोलिसांना ट्रक-डंपरच्या सहाय्याने चिरडून मारण्यात आले. बुधवारी ३ वाजता रांचीमधील महिला पोलिस निरीक्षक संध्या टोपनो यांच्यावर पिकअप व्हॅनने हल्ला करण्यात आला. पशुतस्करी केली जात असल्याची खबर लागताच पोलिसांनी वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी एका पिकअप व्हॅनला अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तेव्हा ड्रायव्हरने वेगाने वाहन चालवत संध्या टोपनो यांच्यावर गाडी घातली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गाडीसह त्या चालकाला अटक केली.

गुजरातमध्ये आणंद येथे मंगळवारी पोलिस अधिकारी राजकिरण यांना ट्रकने चिरडले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही हत्या जाणीवपूर्वक करण्यात आली होती की, केवळ अपघात होता याची तपासणी आता केली जात आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

अडीच वर्षांनंतर प्रगती एक्स्प्रेस धावणार नव्या रुपात!

‘सर्वोच्च’ निर्णय; ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

 

हरयाणातही अशीच घटना मंगळवारी घडली. हरयाणातील नूंह जिल्ह्यात अवैध पद्धतीने होत असलेल्या खाणकामाला विरोध करणारे पोलिस अधिकारी सुरेंद्र सिंह यांच्यावर डंपर घालण्यात आला. त्यांनी या डंपरला थांबण्याचा इशारा दिला होता पण डंपर चालकाने वेगाने गाडी चालवत या अधिकाऱ्याच्या अंगावर घातली. त्यात सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version