महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि सध्या बेपत्ता असलेले अनिल देशमुख यांच्या शोधासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात धाव घेतल्यावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयानेच आता देशमुख यांना समन्स बजावले आहे. पुढील महिन्यात १६ नोव्हेंबरपर्यंत देशमुख यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत.
मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने पाच वेळा समन्स पाठवूनही अनिल देशमुख ईडीला सामोरे गेलेले नाहीत. शिवाय, त्यांचा थांगपत्ताही त्यानंतर लागलेला नाही. शेवटी न्यायालयानेच त्यांना नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितले आहे.
शुक्रवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर.एम. नेरळीकर यांनी देशमुख यांच्याविरोधात कारवाई सुरू करत त्यांना हे समन्स जारी केले आहे. या समन्सच्या माध्यमातून आरोपीला त्याच्याविरुद्ध केलेल्या याचिकेची जाणीव करून दिली जाते. त्यामुळे त्या व्यक्तीने न्यायालयात येऊन आपली बाजू मांडावी अशी अपेक्षा असते.
महानगर दंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आरोपी देशमुख यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी खटला उभा राहू शकतो. ईडीचे हे समन्स देशमुख यांचे वकील आणि त्यांच्या मुलीने स्वीकारले आहे.
हे ही वाचा:
मान्सून निघाला गावाला…७ ऑक्टोबरपर्यंत राहणार
धक्कादायक! प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला होता मुंडके नसलेला मृतदेह
…हा निर्णय न्हावा शेवा सागरी पुलावरून समुद्र दिसावा म्हणून!
गेल्याच महिन्यात ईडीने देशमुख यांच्याशी संबंधित कंपन्या आणि १४ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती.
समन्स स्वीकारल्यानंतरही अनिल देशमुख हे ईडी समोर हजर झाले नाहीत तर भारतीय दंडविधानाच्या कलम १७४ अंतर्गत तो गुन्हा आहे.