आता महाराष्ट्रातील ट्विन टॉवर पडणार

आता महाराष्ट्रातील ट्विन टॉवर पडणार

दिल्लीतल्या नाॅएडा येथील बेकायदेशीरपणे बांधलेला ४० मजली ट्विन टाॅवर अवघ्या १२ सेकंदात धाडकन पाडण्यात आला. इतका माेठा टाॅवर कसा पाडणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली हाेती. हा ट्विन टाॅवर पडताना सर्वांनी याचे देही याचे डाेळा पाहिले. पण आता नाॅयडातल्या या ट्विन टाॅवरनंतर आणखी एक टाॅवर पाडण्यात येणार आहे.

हा टाॅवर महाराष्ट्रात दापाेली येथे आहे. हा टाॅवर दुसरा तिसरा काेणता नसून आमदार अनिल परब यांचे रिसाॅर्ट आहे. नाॅयडातील ट्विन टाॅवर तुटला, आता दापाेलीतील तुटणार असे ट्विट भाजपचे नेते किरीट साेमय्या यांनी केले आहे. या ट्विटची चर्चा रंगली आहे.

किरिट साेमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये एक फाेटाे शेअर केला आहे. या फाेटाेत वरच्या बाजुला नाॅयडातील ट्विन टाॅवर दिसत असून खालच्या फाेटेमध्ये परब यांच्या दापाेतील साई रिसार्टच्या दाेन इमारतींचा फाेटाे दिसत आहे. या ट्विटमध्ये साेमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी साई रिसाॅर्टच्या बांधकामावर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं हाेते.

सध्या किरीट साेमय्या हे ऍक्शन माेडमध्ये आल्याचे दिसत आहे. शुक्रवारी मढ येथील अस्लम शेख यांच्या बेकायदेशीर स्टुडिओवर कारवाईची मागणी करत साेमय्या शुक्रवारी मढ येथील त्यांच्या स्टुडिओत जाऊन धडकले. शनिवारी थेट दापाेली गाठत अनिल परब यांच्या साई रिसाॅटवर कारवाई करण्याची मागणी केली. हातात हाताेडा आणि फावड्याच्या प्रतिकृती घेऊन हा रिसाॅर्ट आता लवकरच इतिहास जमा हाेणार, असे ते म्हणाले. एखाद्या लहान व्यक्तीनं काही अनधिकृत बांधकाम केलं तर त्यावर हाताेडा मारला जाताे, असं म्हणत साेमय्या यांनी आक्रमक होत आपल्या हातातील हाताेडा उगारून दाखवला. रविवारी नाॅयडातील ट्विन टाॅवर ताेडल्याचे निमित्त साधत साेमय्या यांनी पुन्हा एकदा परब यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचे हे ट्विट व्हायरल हाेत आहे.

हे ही वाचा:

आगामी सणांमध्ये तुम्ही ‘ही’ उत्पादने भेट द्या

गणेशोत्सवासाठी भाजपाकडून चाकरमान्यांना ५०० बसेस

…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

राहुल गांधींना सुनावत माजी खासदार एम. ए. खान यांचा काँग्रेसला रामराम

रत्नागिरीतल्या दापाेली येथील या रिसाॅर्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आराेपही साेमय्या यांनी केला आहे. अनिल परब यांचे साई रिसाॅर्ट ही १,००० काेटींची मालमत्ता आहे. या रिसाॅर्टमध्ये एक दिवस राहण्याचं भाडे ३५ हजार आहे. ही जागा त्यांनी विभा साठे यांच्याकडून घेतली व नंतर सदा परब यांनी हा रिसाॅर्ट अनिल परब यांच्याकडून विकत घेतला. असा आराेप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांच्या रिसाॅर्टची फाईल मागवली असून हा रिसाॅर्ट ताेडण्याचे आदेश दिलेले असल्याचेही साेमय्या यावेळी म्हणाले.

Exit mobile version