कुख्यात गुंड अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा, दोन साथीदारांनाही आजीवन तुरुंगवास

उमेश पाल अपहरण प्रकरणी ठोठावली शिक्षा

कुख्यात गुंड अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा, दोन साथीदारांनाही आजीवन तुरुंगवास

तब्बल १७ वर्ष जुन्या उमेश पाल अपहरण प्रकरणी कुख्यात डॉन अतिक अहमद याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना उत्तरप्रदेशातील प्रयागराजच्या विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने जन्मठेप आणि उमेश पालच्या नातेवाईकंना प्रत्येकाकडून एक लाखांची भरपाई तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणात अतिकसह सौलत हनिफ आणि दिनेश पासी यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर अश्रफसह सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

अहमद आणि अशरफ यांच्यावर २००५ साली राजू पाल यांच्या हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.  बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्याशी संबंधित खटल्यात न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला आहे.

या प्रकरणात २८ फेब्रुवारी २००६ रोजी अतिक अहमद आणि अशरफ यांनी उमेश पाल यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.उमेश पाल यांना मारहाण केल्यानंतर, कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात बळजबरीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. उत्तरप्रदेशात मायावतींचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाच जुलै २००७ रोजी उमेश पाल यांनी अतिक आणि अशरफ यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. पोलिस तपासात आणखी सहा जणांची नावे समोर आली. अतिक आणि अशरफसह ११ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी २००९ मध्ये सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार हजर करण्यात आले. या प्रकरणातील ११ आरोपींपैकी अन्सार बाबा नावाच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अतीक आणि अशरफसह एकूण दहा आरोपींविरोधात न्यायालयाने मंगळवारी आपला निकाल दिला आहे.

हे ही वाचा:

सौदी अरबमध्ये हज यात्रेकरुंची बस आगीच्या भक्ष्यस्थानी,२० प्रवाशांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना सहन होत नाही… मग करणार काय?

देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी

राम सेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा!

काय आहे प्रकरण?

बसपाचे आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्याशी संबंधित खटल्यामध्ये न्यायालयाने उमेश पाल यांचे अपहरण करून २८ फेब्रुवारी रोजी अतिक अहमद आणि अशरफ यांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. तसेच उमेश पाल याना मारहाण केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. पाच जुलै २००७ ला उमेश पाल यांनी अतिक अहमद आणि अशरफ यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केले होते. यामध्ये पोलीस तपासात आणखी सहा जणांची नावे समोर आली होती. एकूण न्यायालयात अतिक अहमद आणि अशरफ यांच्याबरोबर ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.२००९ साली या खटल्याची सुनावणी सुरु होऊन सरकारी पक्षातर्फे यामध्ये एकूण आठ साक्षीदार हजर केले गेले. ११ आरोपींपैकी अन्सार बाबा नावाच्या आरोपीचा मृत्यू झाला. अतिक आणि अशरफ सह दहा आरोपींविरोधात आज न्यायालयाने निकाल दिला आहे.

Exit mobile version