देशमुखांच्या वकिलांचा दावा
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बार मालकाकडून वसूल केलेले ४ कोटी ७० लाख रुपये दिल्याची कबुली सचिन वाझेने ईडीकडे दिली होती. देशमुखांसाठी नंबर १ हा शब्दप्रयोग वाझे करत असे. ईडीच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. मात्र देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांचे म्हणणे आहे की, नंबर १ अनिल देशमुख नसून माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आहेत. अनिल देशमुख हे एकदा परमबीर सिंग याच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावाही करणार होते पण नंतर ते राहून गेले.
अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आज दुपारी त्यांच्या फोर्ट येथील कार्यलायत पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी देशमुखांच्या वतीने म्हणणे मांडले त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्टात गेलो आहोत. आपल्याला माहीत आहे अनिल देशमुख प्रकरणात ईडी कडून बातम्या येत होत्या पण, त्यात अनेक विसंगती होत्या. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणच न्याय्य नाही त्यामुळे देशमुख हे चौकशीसाठी उपस्थित राहात नाहीत. ही चौकशी म्हणजे छळच आहे.
या प्रकरणाची सुनावणी संपली आहे. नक्की काय सत्यता आहे हे सांगण्यासाठी आज मी आलो आहे. याबाबत सतत बातम्या येत असतात, पण या बातम्या केवळ ऐकीव आहेत, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही
पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत
डबघाईस आलेल्या ललित कला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळालाच डच्चू द्या!
‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबाला द्या ५० लाख
घुमरे म्हणाले की, अनिल देशमुख हे सुप्रीम कोर्टातही गेले आहेत. हायकोर्टतील प्रकरणावर आम्ही भाष्य करणार नाही,
न्यायमूर्ती चंदिवाल यांच्या कमिशन समोर अनेक गोष्टी आलेल्या आहेत, त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात ते देशमुख यांच्यासंदर्भात काही बोलत नाहीत. त्यात तो ४ कोटी ७० लाखबाबत काही बोलत नाही. आपण अनिल देशमुख यांना भेटल्याचेही वाझे सांगत नाही. वाझे यांने केवळ एकदा जानेवारी मध्ये भेटल्याचे म्हटले आहे. सीबीआय आणि ईडी जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस त्या ठिकाणी असतो.
देशमुख यांचे वकील म्हणाले की, आरती देशमुख यांना आज समन्स पाठविण्यात आले होते. आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख या तीन जणांना समन्स ईडीने दिले आहे. सचिन वाझेने दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब दबावा खालीच असतो. सीआरपीसीमध्ये पोलिसांसमोर दिलेला जबाब हा स्वीकारला जात नाही. आयोगा समोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिल्याचे सांगितलेले नाही. १०० कोटींचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे.
वकिलांनी पुढे सांगितले की, अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती या ६६ वर्षाच्या आहेत.त्या आजारी आहेत. त्यांना करोना झाला आहे. त्यांचा या व्यवहारांशी काहीही संबंध नाही. एकदा अनिल देशमुख यांच्या घरी ईडी गेली होती. कोणताही माणसाला स्वतःला वाचवण्याचा अधिकार आहे. अनिल देशमुख यांनी झूम द्वारे चौकशी ला समोर जायची तयारी दाखवली होती ती कागदपत्रे आहेत.