सुकेश चंद्रशेखर विरुद्ध वसुलीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही ही फिर्यादी साक्षीदार असेल, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघीही २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. यामध्ये सुकेश चंद्रशेखर याचे मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस यांची याआधीही तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर झाल्या होत्या.
‘नोरा फतेही ही या प्रकरणात पीडित आणि एक साक्षीदार असल्याने ती या तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे. ती वसुलीच्या कोणत्याही घटनेत सहभागी झालेली नाही. तिचे आणि आरोपीचा कोणताही वैयक्तिक संबंध नाही,’ असे नोरा फतेहीच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’…विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजपासून श्रीगणेशा
जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात
… म्हणून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ
ईडीने दिलेल्या माहितीनुसार नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरने बीएमडब्ल्यू गाडी भेट दिली होती. यावर नोरा हिने खुलासा केला की, चंद्रशेखरने तिला गाडी दिली आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल हिनेही तिला गुच्ची बॅग आणि एक आयफोन दिला होता. १४ ऑक्टोबर रोजी नोरा फतेही आणि सुकेश याची भेट झाली होती आणि यादरम्यान गिफ्टवर चर्चा झाली होती.
सुकेश चंद्रशेखर हा एक फसवणूक करणारा व्यक्ती असून त्याने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यासह व्यावसायिक लोक, राजकारणी यांच्याकडून शेकडो कोटी रुपये उकळले आहेत. रॅनबॅक्सीचे माजी मालक शिवेंद्र सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांना त्याने काही मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि व्हॉईस मॉड्युलेशन सॉफ्टवेअर वापरून संपर्क केला होता. शिवेंद्र सिंग हे सध्या तुरुंगात असून त्यांच्या सुटकेच्या बहाण्याने अदिती यांच्याकडून त्याने २१५ कोटी रुपये उकळले. सध्या सुकेश गुन्हेगारी प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात असून त्याच्यावर १५ एफआयआर दाखल आहेत.