माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध वॉरंट जारी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध वॉरंट जारी

वारंवार समन्स बजावून देखील चौकशीला हजर होत आयोगासमोर हजर होत नसल्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध न्या. चांदीवाल आयोगाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट सिंग यांना बजावण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या आधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असे आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक यांना आदेश दिले आहे. ५० हजार रुपयांचे हे जामीनपात्र वॉरंट असून सिंग यांना पैसे भरून हे वॉरंट रद्द करता येणार आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपाप्रकरणी राज्य शासनाने सेवानिवृत्त न्या. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा असे शासनाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान या समितीने चौकशी सुरू करून परमबीर सिंग यांना आयोगा समोर हजर राहण्यासाठी तीन वेळा समन्स पाठवून देखील सिंग हे चौकशीला उपस्थित राहिले नाही. आयोगाने तिन्ही वेळा दंड आकाराला होता.

हे ही वाचा:

…म्हणून कोहली आणि रवी शास्त्रींवर बीसीसीआय नाराज!

शिवाजी पार्कमधील पुत्रंजीवाच्या झाडाचा घेतला जीव

कोण होणार अफगाणिस्तान सरकारचा प्रमुख?

मुंबई महानगरपालिकेचे ५१ कोटीचे दोन पदपथ

दरम्यान परमबीर सिंग यांना चौथे समन्स पाठवून मंगळवारी त्यांना आयोगासमोर हजर राहायचे होते मात्र आज ही ते हजर न राहिल्यामुळे आयोगाने त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट बजावण्यसाठी पोलीस महासंचालकानी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांची नेमणूक करण्याचे आदेश न्या. चांदीवाल आयोगाने महासंचालक यांना दिले आहे. हे वॉरंट जामीनपत्र असून ५० हजार रुपयांचा दंड भरून हे वॉरंट रद्द करून जामीन घेता येणार आहे.

Exit mobile version