घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट गुरुवारी जारी करण्यात आले आहे. अर्षद खान हे माजी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचा निकटवर्तीय असून त्याला इगो मिडियाकडून ८४ लाख रुपये धनादेश द्वारे मिळाले होते.

अर्षद खान याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते, त्यानंतर त्याने अटक पूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

घाटकोपर पूर्व या ठिकाणी १३ मे रोजी अनधिकृत महाकाय होर्डिंग कोसळून पेट्रोल पंपावर पडून १७ जणांचा मृत्यू झाला होता, या प्रकरणी होर्डिंग उभारणारी कंपनी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे, कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठे सह चार जणांना अटक करण्यात आली होती. इगो मीडिया या कंपनीला बेकायदेशीर होर्डिंग उभे करण्यासाठी रेल्वे पोलीस माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी परवानगी पत्रावर स्वाक्षरी केली होती.

या प्रकरणात खालिद यांचे देखील एसआयटी ने जबाब नोंदवला होता, विशेष तपास पथक (एसआयटी) च्या तपासात खालिद यांचा निकटवर्तीय असलेला अर्षद खान याला इगो मीडिया कंपनीकडून ८४ लाख रुपये धनादेश द्वारे मिळाले होते असे उघड झाले होते.

हे ही वाचा:

पोलिओग्रस्त वृद्ध दाम्पत्याला ६० लाखांना फसवले, २ लाख परत मिळाले!

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ममतांची बलात्कारविरोधी कायदा कठोर करण्याची मागणी

कोलकाता हत्याप्रकरणी सीबीआयचा सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल

विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्त्यावर गुन्हा

या प्रकरणात एसआयटीने अर्षद खान याला आरोपी बनविले होते, अर्षद खान याने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अर्षद खान याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता, त्यानंतर अर्षद खान फरार झाला. दरम्यान किल्ला न्यायालयाने अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले असून एसआयटीने हे वॉरंट जारी करून अर्षद खानच्या अटकेसाठी ३ पथके तयार करण्यात आली आहे.

Exit mobile version