‘वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्यात आलेली नाही’

‘वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्यात आलेली नाही’

मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून पुढे आले स्पष्टीकरण

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या केलेल्या तक्रारीत काही तथ्य नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे केली होती तक्रार.

या तक्रारींनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्याकडून चौकशी करून अहवाल मागवला होता. या प्रकरणात चौकशीनंतर वानखेडेच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार समीर वानखेडे यांनी केलेल्या तक्रारीत नवाब मलिक यांच्या मुलीकडून पोलिसांचा वापर करून त्यांच्यावर पाळत ठेवली जातीय अस म्हणण्यात आलं होतं. वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या मोबाईल फोनचे लोकेशनही शोधलं जावं अस तक्रारीत म्हटलं होतं. ओशिवारा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी ११ तारखेला त्या कब्रस्थानात गेले होते मात्र एका ऑटोरीक्षा चोरीच्या प्रकरणात तिथला सीसीटीव्ही मिळवण्यासाठी गेले होते, असे चौकशीनंतर समोर आले आहे.

वानखेडे रोज कब्रस्थानात जातात याची त्यांना कल्पना नव्हती, त्यांनी त्या दिवशी त्यांना तिथे पाहिलं नाही असा या दोन्ही कॉन्स्टेबलनी त्यांच्या जबाबत सांगितल्याची माहितीही मिळाली आहे.

 

हे ही वाचा:

‘भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील’

झोमॅटोचा ट्विटने लागली पाकिस्तानला मिरची

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

कोरोनाच्या लाटेनंतर आता राज्यात डेंग्यू, चिकनगुनियाची लाट!

 

क्रूझवर केलेल्या छापेमारीत समीर वानखेडे यांच्या पथकाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला पकडले होते. त्याच्यासोबत आणखी काही लोकांनाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही कारवाई बनावट असल्याचा आरोप करत वानखेडे यांचे कॉल रेकॉर्ड्स मुंबई पोलिसांनी तपासावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे म्हटले होते.

Exit mobile version