दाऊदच्या बातमीनंतर डोंगरीत सन्नाटा…

, हमे कुछ मालूम नही... स्थानिकाकडून मिळत आहे उत्तरे

दाऊदच्या बातमीनंतर डोंगरीत सन्नाटा…

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आला, तो कराचीत एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे या प्रकारचे वृत्त सोमवार सकाळ पासून सोशल मिडियावर धडकत आहे.दाऊद इब्राहिमचे नक्की काय झाले, पाकिस्तान येथील इंटरनेट सेवा का बंद ठेवण्यात आली याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप कुठलीही तपास यंत्रणांकडून आलेला नसला तरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तर एकेकाळी दाऊदचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या डोंगरीमध्ये या वृत्तामुळे सन्नाटा पसरला आहे.

 

अंडरवर्ल्ड डॉन आणि जागतिक गुन्हेगारीतील टॉपटेन मधील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला, व तो सध्या पाकिस्तान कराची शहरात एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली असून दाऊदच्या जवळच्या नातलगा व्यतिरिक्त रुग्णालयात इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही. तसेच या कारणामुळे पाकिस्तान येथील इंटरनेट सेवा काही कालावधीसाठी खंडित करण्यात आली आहे, असे वृत्त रविवार रात्रीपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असले तरी याची सत्यता अद्याप समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

अतिक अहमदचा सहकारी नफिस बिर्याणी मृत्युमुखी!

अहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात,आठ जणांचा मृत्यू!

उत्तराखंडमधील पर्यटक आता हवेत उडणार!

काँग्रेसच्या ‘देशासाठी दान’ आवाहनावर इन्कलाब चित्रपटाच्या क्लिपने उत्तर!

दाऊद इब्राहिम याचा एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा डोंगरीमध्ये सोमवार सकाळपासून सन्नाटा पसरला आहे. दाऊद इब्राहिम याने मुंबईतील डोंगरी परिसरातून गुन्हेगारी कारकीर्द सुरू केली होती. लहानाचा मोठा डोंगरीत झालेल्या दाऊदचे अनेक नातेवाईक, सहकारी या विभागात राहण्यास आहे. दाऊदची प्रत्येक माहिती सर्वप्रथम डोंगरीत येऊन धडकते, मात्र दाऊदवर कराचीत झालेल्या विषप्रयोगाच्या वृत्ताने मात्र डोंगरीतील प्रत्येक अनभिज्ञ आहेत.

 

दाऊदच्या या वृत्ताने डोंगरीत सन्नाटा पसरला असून याबाबत कोणीही बोलण्यास पुढे येत नसल्याचे समजते. ‘ मुंबई पोलिसांकडून याबाबत सत्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीनी दाऊदच्या संबंधित लोकांकडून तसेच खबऱ्याकडून माहिती मिळवीण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु “हमको कुछ भी मालूम नही, सोशल मीडिया और टीव्ही के खबरो से हमे पता चला है, अशी उत्तरे देण्यात येत आहे.

Exit mobile version