सुशांत सिंगची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लीन चीट

सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

सुशांत सिंगची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लीन चीट

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात शनिवारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आपली क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून आता हा तपास अधिकृतपणे बंद करण्यात आला आहे.

CBI च्या चौकशीनुसार, सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही, जसा संशय त्यांच्या कुटुंबीयांना होता. सूत्रांनी सांगितले की, “क्लोजर रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.”

सुशांतच्या कुटुंबाने रिया आणि तिच्या कुटुंबावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि त्याच्या आर्थिक निधीचा गैरवापर करण्याचा आरोप केला होता. मात्र, CBI च्या रिपोर्टनुसार, सुशांतने स्वतः आत्महत्या केली असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

समीर वानखेडे यांची एण्ट्री सालियन प्रकरणाला देणार नवे वळण

हरियाणा: २५ कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त, पाकिस्तानी चलनासह २ तस्करांना अटक!

उद्धव ठाकरेंनी केलेल्या ‘त्या’ दोन फोनबद्दल नारायण राणे काय म्हणाले?

सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स विरुद्ध दमदार सुरुवात करण्यास सज्ज

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत यांचा मृतदेह मुंबईतील त्यांच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला हा आत्महत्येचा केस मानला जात होता, मात्र नंतर हत्या असल्याचा संशय उपस्थित करण्यात आला.

यानंतर CBI कडे तपास सोपवण्यात आला आणि तब्बल पाच वर्षांनंतर एजन्सीने आपली क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

आता पुढील निर्णय न्यायालयाचा

CBI ने आपला अंतिम अहवाल मुंबईतील विशेष न्यायालयासमोर सादर केला आहे. आता न्यायालय ठरवेल की ही रिपोर्ट स्वीकारायची की पुढील तपासाचे आदेश द्यायचे.

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर CBI ने हा तपास आपल्या हाती घेतला. या प्रकरणात AIIMS फॉरेन्सिक तज्ज्ञांनी विषबाधा आणि गळा दाबून हत्या करण्याच्या शक्यतांना फेटाळले होते.

CBI ने या तपासादरम्यान रिया चक्रवर्ती आणि तिच्या जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले आणि सुशांतचे वैद्यकीय अहवाल संकलित केले.

सुशांतच्या वडिलांनी आरोप केला होता की रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाच्या पैशांचा गैरवापर केला. मात्र, रिया चक्रवर्तीने हे आरोप फेटाळले होते.

रिया आणि काही अन्य बॉलीवूड कलाकारांची चौकशी झाली होती. एवढेच नव्हे तर, रिया चक्रवर्तीला जवळपास एका महिन्यासाठी तुरुंगातही राहावे लागले होते. CBI ने सुरुवातीपासूनच आत्महत्या आणि हत्या दोन्ही शक्यतांवर तपास केला, मात्र अखेरीस हा आत्महत्येचा केस असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Exit mobile version