आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही

आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला काही दिवसांपूर्वी क्रूझ ड्रग्ज प्रकरणी जामीन मिळाला. त्यानंतर या प्रकरणाचा मुंबई उच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश आला असून त्यामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत गुन्हा करण्याचा कट रचला होता, असा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही, असे तपशीलवार आदेशात म्हटले आहे.

न्यायालयाने आज दिलेल्या तपशीलवार जारी केलेल्या आदेशामध्ये जामीन का मंजूर करण्यात आला हे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हा करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तसेच व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

हे ही वाचा:

आनंद महिंद्रना बुटांच्या स्टार्टअपचा ‘आशय’ भावला!

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

घरातला गॅस संपला आणि एसटी कर्मचाऱ्याने जीवनही संपविले

‘एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील’

तिघांविरुद्ध पुरावे गोळा करण्यास एनसीबी अपयशी ठरल्याचेही म्हटले आहे. तिघांचीही वैद्यकीय तपासणी झाली नसल्यामुळे त्यांनी छापा पडला तेव्हा ड्रग्ज घेतले होते की नाही याचे पुरावेही नाहीत.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी या तिघांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आदेशाची तपशीलवार प्रत आज उपलब्ध करण्यात आली. त्यांच्यावर NDPS कायद्याच्या कलम २०(b), कलम २७, २८, २९ आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version