दिवंगत डीसीपी पुत्र विशाल कांबळे आणि पत्नी रोहिणी यांच्या अपहरणकर्त्याना अटक करून ४८ तास उलटले मात्र विशाल कांबळे यांचा अद्याप कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. अटक करण्यात आलेल्या आरोपीनी विशालची हत्या करून मृतदेह वडोदरा अहमदाबाद रोडवर फेकला असल्याची कबुली जरी दिली असली तरी अद्याप विशाल याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नसल्यामुळे हे कोडे कसे सोडवायचे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
कोल्हापूर येथून न्यायालयीन कामासाठी आलेल्या विशाल कांबळे हा आई रोहिणी (८०) सोबत मार्च महिन्यात मुंबईत आले होते. चेंबूर येथील हॉटेल निलकमल येथे थांबलेल्या विशाल कांबळे आणि रोहिणी कांबळे हे दोघे ४ एप्रिल रोजी हॉटेलच्या बाहेरून अचानक बेपत्ता झाले होते. २१ एप्रिल रोजी या दोघांच्या हरवल्याची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिकरित्या तपास करून २ मे रोजी पाच अपहरणकर्त्याना अटक करण्यात आली. या अपहरणकर्त्यामध्ये रोहिणी यांचा भाचा प्रणव रामटके याचा समावेश आहे.
हे ही वाचा:
पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!
संरक्षण संशोधन तथा डीआरडीओचा शास्त्रज्ञ अडकला हनी ट्रॅपमध्ये
मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा
लष्कराचे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळले
अटक करण्यात आलेल्या आरोपीनी विशाल कांबळे आणि रोहिणी कांबळे यांचे मालमत्तेच्या वादातून हॉटेल बाहेरून अपहरण केले होते, रोहिणी यांना गोरेगाव रॉयल पाम येथे एका खोलीत डांबून ठेवत विशाल याची हत्या करून मृतदेह वडोदरा अहमदाबाद रोड या ठिकाणी फेकला असल्याची कबुली आरोपीने दिली.
चेंबूर पोलिसांनी गोरेगाव येथून रोहिणी यांची सुखरूप सुटका करून त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. चेंबूर पोलिसांचे एक पथक वडोदरा अहमदाबाद रोड येथे मृतदेहाच्या शोधासाठी रवाना झाले मात्र ४८ तास उलटूनही अद्याप विशाल चा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्या, अपहरण,पुरावा नष्ट करणे, गुंगीचे औषध देणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप विशालचा मृतदेह मिळून न आल्यामुळे विशाल चे नेमके काय झाले याबाबत पोलिसांना कोडे पडले आहे.