क्षमतेपेक्षा अवजड वाहनांमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रस्त्यांच्या नुकसानीला अवजड वाहने ही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. त्यामुळेच अवजड वाहनांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. गेल्या अडीच वर्षांमध्ये अशा १,६९९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. परंतु असे असले तरीही पोलीस ठाण्यातील तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रत्येक वाहनांना माल नेण्यासाठी काही नियमावली आखून दिलेली आहे. मालवाहू नोंदणी प्रमाणपत्रावरच आरटीओकडून ही नोंद केली जाते. परंतु मालवाहतूकदार मात्र या नियमावलीकडे दुर्लक्ष करतात. राज्यामध्ये एप्रिल २०१९ पासून ते २०२१ आगस्टपर्यंत ४० हजार ८९६ वाहनांनी नियमांचे पालन केले नव्हते. याअंतर्गत जवळपास २३ हजार ९३० अवजड वाहने आरटीओकडून ताब्यात घेण्यात आली होती. याच दंडवसुलीमधून गेल्या वर्षी ११३ कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आलेला होता.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. उरण तालुक्यासह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची खूप मोठी समस्या आहे.
हे ही वाचा:
आर्यन खानसह तिघांना राहावे लागणार एक दिवस कोठडीत
ठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!
निर्भयांची कामगिरी; चोरावर पडली भारी..
सोसायटीतील ‘सीसीटीव्हीं’नीच केली चोरी…वाचा!
नवी मुंबई ते ठाणे तसेच मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड रहदारी, वाहतूककोंडी असते. यात जेएनपीटीमधून निघणाऱ्या अवजड कंटेनर वाहतुकीमुळे सामान्य वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दिवसा या अवजड वाहनांना वाहतूक बंदी करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. मात्र त्याकडे तितके गांभीर्याने पहिले जात नव्हते. आता ठाण्याच्या वाहतूककोंडीची दाखल घेतल्याने जेएनपीटीमधून निघणाऱ्या मार्गावरील वाहतूककोंडीला चाप बसणार आहे. कारण दिवसा या जड वाहनांना रस्त्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.