बिहारच्या जमुई जिल्ह्यात जनता दला(युनायटेड)च्या नेत्यावर अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे.या हल्ल्यात गंभीर झालेल्या नेत्याला उपचारासाठी पाटणा येथे हलवण्यात आले आहे.
सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.जेडी(यू) शहराध्यक्ष आणि माजी वॉर्ड नगरसेवक पवन साह हे बाजारातून घरी परतत होते.तेव्हा अचानक काही अनोळखी लोक त्यांच्यासमोर आले आणि त्यांनी पवन साह यांच्यावर गोळीबार केला.हल्लेखोरांनी साह यांच्यावर तीन गोळ्या झाडून तेथून पळ काढला.
हे ही वाचा:
लोकसभा अध्यक्षांकडून ४९ खासदारांचे निलंबन
नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार?
लालकृष्ण अडवाणी, एमएम जोशींना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला न येण्याची केली विनंती!
भारत हा जगातील ‘स्टार परफॉर्मर’ – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पवन साहला जवळच्या रुग्णालयात नेले. गंभीर जखमी झालेल्या पवन साहने सांगितले की, हल्लेखोरांना मी ओळखत नाही.माझ्यावर हल्ला का करण्यात आला याचीही माहिती माझाकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या हल्ल्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा असे एका एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.काही दिवसांपूर्वी वाहन स्टँडवरून पवन साह यांचा वाद झाला होता, या वादातून ही घटना घडली अशी शंका असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याचे काम चालू असून लवकरच या प्रकरणाचा पोलीस छडा लावतील, असेही ते म्हणाले.